-
आज बहुतेक खाद्यपदार्थांत पाम तेल वापरतात. पाम तेल हा वनस्पती तेलाचा एक प्रकार आहे. (फोटो सौजन्य:@Freepik)
-
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना लॉर्ड्स मार्क बायोटेकच्या पोषणतज्ज्ञ सांची तिवारी आणि पोषणतज्ज्ञ व रीलॉयस वेलनेसच्या संस्थापक डॉक्टर अस्मिता सावे यांनी पॅकबंद पदार्थांमधील सर्वांत सामान्य घटक ‘पाम तेल’ याबद्दल आरोग्यविषयक चिंता आणि या तेलाचे सेवन कमी करण्याचे काही उपाय सुचविले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाम तेल LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. म्हणजेच याला खराब कोलेस्ट्रॉल म्हटले जाते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांचा धोका वाढतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पाम तेलाच्या सेवनामुळे प्रजनन समस्या उदभवू शकतात आणि यकृत, मूत्रपिंड व फुप्फुसे यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ऑक्सिडायझ्ड पाम ऑइलमुळे हार्मोनल असंतुलन आणि अनेक आरोग्य विषयक चिंताही व्यक्त केल्या जात आहेत. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
पाम तेलाचा वापर कमी करण्यासाठी किंवा पाम तेलाचे सेवन कमी करू पाहणाऱ्या लोकांसाठी काही पर्याय खालीलप्रमाणे : (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आरोग्यदायी स्वयंपाक तेल निवडा- ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकॅडो ऑइल किंवा सूर्यफूल तेल यांसारख्या उच्च पातळीच्या चरबीसह असणारे तेल स्वयंपकासाठी निवडा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
खाद्यपदार्थांची लेबले वाचा- पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी नीट तपासून घ्या. पाम तेल असलेली उत्पादने ओळखण्यासाठी पदार्थांच्या पॅकेटवरील लेबले एकदा वाचून घ्या. (फोटो सौजन्य: इंडियन एक्स्प्रेस/ Freepik)
-
स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या तेलांसह प्रयोग करा आणि वाढलेली चरबी कमी करण्यासाठी वाफाळणे, बेकिंग, ग्रिलिंग यांसारख्या आरोग्यदायी स्वयंपाकाच्या पद्धतींचा स्वयंपाक बनविण्यासाठी वापर करा. (फोटो सौजन्य: @लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण