-
पुरी भाजी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. अनेक जण आवडीने पुरी भाजी खातात. काही लोकांना हॉटेलमधील पुरी भाजी खायला आवडते पण तुम्ही घरी सुद्धा हॉटेलसारखीच चविष्ठ पुरी भाजी बनवू शकता. ही पुरी भाजी बनविणे अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला ही खास रेसिपी जाणून घ्यावी लागेल. (Photo : Social Media)
-
पुरी तयार करण्यासाठी साहित्य – गव्हाचे पीठ, रवा, मीठ, तेल आणि मीठ (Photo : Social Media)
-
सुरुवातीला गव्हाचे पीठ एका भांड्यात घ्यावे. त्यात रवा टाकावा. त्यानंतर त्यात थोडे गरम तेल टाकावे.थोडे चवीनुसार मीठ घालावे. पाण्याने पीठ मळून घ्यावे.पीठ कडक मळावे.अर्धा तास हे मळलेले पीठ झाकूण ठेवावे.त्यानंतर तेल लावून पुरी लाटून घ्यावी.पुरी तळण्यासाठी कढईत तेल गरम करावे. गरम तेलात पुरी तळून घ्यावी. (Photo : Social Media)
-
भाजी तयार करण्यासाठी साहित्य – बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, कढीपत्ता, उकळलेले बटाटे, लसूण, आलं, जिरे, मोहरी, हिंग, लाल तिखट, लवंग, मिरे, दालचिनी, खोबरे, धनेपूड, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ (Photo : Social Media)
-
सुरुवातीला बटाटे उकळून घ्या. त्यानंतर हे बटाटे सोलून घ्या आणि हाताने कुस्करुन घ्या. त्यानंतर लसूण आणि आलं बारीक ठेचून घ्या. (Photo : Social Media)
-
कढई गॅसवर ठेवा त्यात तेल गरम करा.त्यानंतर गरम तेलात मोहरी आणि जिरे टाका. त्यानंतर त्यात दालचिनी, तीन लवंग, तीन मिरे टाकावीत. दोन तेजपान टाकावे आणि त्यात ठेचून घेतलेले आलं लसूण त्यात टाकावे.त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकावा.त्यानंतर त्यात कढीपत्ता घालावा. (Photo : Social Media)
-
त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. त्यात बारीक किसलेले खोबरे त्यात घालावे. त्यात हळद आणि हिंग टाका. कमी आचेवर परतून घ्या. (Photo : Social Media)
-
लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला त्यात टाका आणि परतून घ्या.त्यानंतर उकळलेले बटाटे त्यात टाका आणि चांगले परतून घ्या. शेवटी त्यात थोडे प्रमाणानुसार गरम पाणी घाला.भाजीला उकळी येऊ द्या. (Photo : Social Media)
-
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यात टाका.शेवटी ही गरमा गरम पुरी भाजी तुम्ही सर्व्ह करू शकता. (Photo : Social Media)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का