-
वय लहान असताना केसांची वाढ, जाडी सर्वांत उत्तम होती; केस गळायचे किंवा तुटण्याचे प्रमाणही कमी असायचे. मात्र, वय वाढत जाते केस पांढरे होणे, गळणे, तुटणे, पातळ होणे यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. त्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र मुख्य कारण हे तेल न लावणे असू शकते.
-
विशेषतः ही समस्या तरुणांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होत असतात. तेल लावल्याने केसचिकट होतात किंवा तेलकट दिसतात. त्यामुळे बहुतांश तरुण व्यक्तींकडून दररोज तेल लावणे टाळले जाते. परिणामी कोंडा, केस – डोक्यावरची त्वचा कोरडी होणे, खाज सुटणे, केस लवकर पांढरे होणे यांसारख्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. असे होऊ नये यासाठी या चार तेलांचा वापर करून पाहा.
-
१. रोजमेरी तेल
रोजमेरी तेल किंवा रोजमेरीची पाने आपल्या केसांसाठी अत्यंत उपयुक्त असतात. ही पाने पाण्यात उकळून थंड झाल्यावर ते पाणी डोक्यावर लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. रोजमेरीमध्ये अँटीइन्फ्लेमेटरी घटक असून, अ, क व बी ६ ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे याच्या तेलाचा वापर केल्यास केसांची वाढ होऊन, ते घनदाट होण्यास मदत होते. -
२. आर्गन तेल
आर्गन तेलामध्ये अ, क व इ या जीवनसत्त्वांचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्स व ओमेगा ६ हे फॅटी अॅसिडदेखील उपलब्ध असते. या तेलाचा वापर केल्यास केसांचे गळणे कमी होते; परिणामी केस जाड होतात. तसेच डोक्यावरील त्वचा मऊ होऊन, कोंडा नाहीसा होण्यास मदत होते. -
३. कांद्याचे तेल
कांद्याचे तेल आपले केस, तसेच डोक्याच्या त्वचेसाठी खूप गुणकारी असते. या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात; जे आपल्या डोक्याच्या त्वचेची काळजी घेतात. तसेच ते त्वचेवरील इन्फेक्शन्स / त्रासांपासून काळजी घेण्याचे कामही करते. कांद्याचे तेल घरी बनवता येऊ शकते. त्यासाठी खोबरेल तेलामध्ये कांद्याचे तुकडे घालून तेल उकळून घ्या. कांद्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा आणि गाळणीच्या साह्याने तेल गाळून घ्या. बघा तयार आहे तुमचे घरगुती कांद्याचे तेल. -
४. बदामाचे तेल
बदामाचे तेल आपले केस तुटणे, गळणे या तक्रारी थांबवते. तसेच ते डोक्यावरील त्वचेला मऊपणा देण्याचे काम करते. याबाबतचा उत्तम फायदा होण्यासाठी अंघोळीआधी किमान एक तास बदामाचे तेल हलकेसे कोमट करून [गरम नाही] आपल्या केसांच्या मुळापासून ते शेवटी टोकापर्यंत लावून ठेवावे. मग अंघोळीदरम्यान केस स्वच्छ धुऊन घ्या. पाहा केस घनदाट, मऊ व चमकदार होण्यास मदत होईल. -
तुम्हाला जर पुन्हा घनदाट, लांबसडक, चमकदार केस हवे असतील, तर या चार तेलांचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. दररोज नाही; परंतु किमान काही दिवसांमधून एकदा आपल्या डोक्याला, केसांना आणि त्यांच्या मुळाशी या चार तेलांचा वापर करू शकता. अशी माहिती एनडीटीव्ही इंडियाच्या एका लेखामधून मिळाली आहे.

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा