-
आपल्या स्वयंपाक घरात अनेक पदार्थ असतात, ज्यांचा वापर आपण आपल्या त्वचेची चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी करू शकतो. साय, हळद, कोरफड, बेसन, मध इत्यादी पदार्थ त्वचेसाठी वापरले जातात हे सर्वांनाच माहित आहे. मात्र दिवसभरात सकाळ-संध्याकाळ प्यायला जाणाऱ्या चहाचासुद्धा आपल्याला वापर करता येतो. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. चहा पाण्याचा वापर कसा करावा आणि त्याचे त्वचेवर कोणते फायदे होतात पाहा. [Photo credit – Freepik]
-
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, ब्लॅक टीमध्ये अँटीएजिंग, तर कॅमोमाइल टीमध्ये त्वचेला आराम देणारे घटक असतात. त्यापैकी तुमच्या गरजेनुसार चहा निवडावा. पातेल्यात कपभर पाणी उकळून घ्यावे. त्यामध्ये तुम्ही निवड केलेल्या चहाची पावडर वा टी बॅग घालून चहा मुरल्यानंतर तो गाळून थंड होऊ द्या.[Photo credit – Freepik]
-
सर्वप्रथम तुमचा चेहरा स्वच्छ करून घ्या. सुती कापडाचा तुकडा चहा पाण्यात बुडवून चेहऱ्यावर फिरवावे. काही मिनिटे चेहऱ्यावर पाणी तसेच राहू द्यावे; नंतर, चेहऱ्याला मसाज करा. तुमच्या गरजेवर, चेहऱ्यावर चहा पाणी तसेच राहू द्यावे अथवा तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्याने चेहरा धुवावा.[Photo credit – Freepik]
-
चेहऱ्यावरील चहाचे पाणी काही वेळानंतर टॉवेलने टिपून घ्यावे. त्यावर तुम्हाला आवश्यकता वाटत असल्यास, मॉइश्चराझरचा पातळ थर लावून तुमचे स्किन केअर संपवावे. त्वचेवर चहा पाण्याचे होणारे फायदे पाहा. [Photo credit – Freepik]
-
१. चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. जे त्वचेला तजेला देऊन ती निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्वचेवरील चिडचिड, जळजळ कमी करण्यास मदत होते. तसेच पुरळ, मुरुमं किंवा त्वचा संवेदनशील असल्यास चहाच्या पाण्याचा उपयोग करू शकता. [Photo credit – Freepik]
-
२. दररोज या घरगुती उपायाचा वापर केल्यास तुमचा त्वचेचा रंग एकसमान होण्यास मदत होते. चहाच्या पाण्याचा वापर केल्याने नैसर्गिकरित्या त्वचेला आराम आणि तजेला मिळण्यास मदत होते. असे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. [Photo credit – Freepik]
-
टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित असल्याने, कृपया यास वैद्यकीय सल्ला समजू नये. [Photo credit – Freepik]

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं