-
लसूण स्वयंपाकघरांममध्ये वापरला जाणारा मुख्य पदार्थ आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आपल्या आवडत्या पदार्थांचा स्वाद वाढविण्याच्या क्षमतेच्या पलीकडे लसणात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हजारो वर्षांपासून पारंपरिक औषधांमध्ये वापरली जाणारी लसूण आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर ठरते आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लसणामध्ये ॲलिसिनसारखी संयुगे असतात; ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संक्रमणांशी लढा देण्यासही मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लसणामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि रक्तात गुठळ्या तयार होण्यापासून रोखणे शक्य होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लसणामधील सल्फर संयुगांत दाहकविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरातील जळजळ आणि संधिवात यांसारख्या स्थितीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लसूण पचनास मदत करून आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि लसणातील प्रतिजैविक गुणधर्मांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लसणात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील तणाव कमी करतात आणि आजारांचा धोका कमी करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कच्चा लसणाचे सेवन केल्याने कालांतराने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास हातभार लावू शकतो. पण, हा त्वरित उपाय नाही. जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसू शकतो.(फोटो सौजन्य: @Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल