-
कोणताही ऋतू असो महत्वाच्या कामासाठी, नोकरीसाठी आपल्या सर्वांनाच घराबाहेर पडावं लागतं. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पावसाळ्यात रेनकोट, छत्री तर हिवाळ्यात जसं स्वेटर आपण घालतो अगदी त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सुद्धा बाहेर पडताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
कडक उन्हाळ्यात स्वत:ची घ्या काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी बॅगेत ठेवणं गरजेचं आहे चला पाहू. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१. पाणी – उन्हाळ्यात हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. निर्जलीकरण टाळण्यासाठी, घराबाहेर पडताना नेहमी पाण्याची बाटली बरोबर ठेवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. स्कार्फ किंवा स्पेक्स – उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याआधी टोपी, स्कार्फ, स्पेक्स यांचा उपयोग करा ; हे तुम्हाला उन्हापासून संरक्षण करण्यास मदत करतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. सनस्क्रीन – सनस्क्रीन ही उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणारी एक आवश्यक वस्तू आहे. हे सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४.फेस मिस्टचा उपयोग करा – फेस मिस्ट चेहऱ्यावर शिंपडल्याने उन्हाळ्यात तुमची त्वचा हायड्रेटेड राहील आणि तुम्हाला पोषण देखील मिळेल. यामुळे हे जास्त घाम येणे, मुरुम येणं आणि घामामुळे इतर त्वचेच्या समस्या टाळण्यास देखील मदत होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. वॅसलिन किंवा लीप बाम – उन्हाळ्यात ओठांसाठीही हायड्रेशन आवश्यक आहे. ओठांना मॉइश्चरायझ आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी काही तासांनी पेट्रोलियम जेली किंवा लिप बाम लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
६. एलोवेरा जेल – एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ; जे त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड