-
Summer Skin Care: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या उन्हात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. (Photo: Freepik)
-
उन्हामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या निर्माण होतात. खास करून नाजूक त्वचा असलेल्यांसाठी उन्हाळा खूपच त्रासदायक असतो. (Photo: Freepik)
-
अनेकांचा चेहरा उन्हाने लाल होतो. अनेकदा सनबर्न किंना एलर्जीमुळे देखील हा लालपणा येतो. (Photo: Freepik)
-
पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, आज आम्ही तुम्हाला दोन उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा मुलायम आणि चमकदार बनवू शकता.(Photo: Freepik)
-
जर तुम्हालाही चेहऱ्यावरील डागांमुळे त्रास होत असेल तर या दोन गोष्टींचा अवश्य वापर करा. नारळ तेल आणि कोरफड. (Photo: Freepik)
-
नारळाच्या तेलात मॉइश्चरायझिंग आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. (Photo: Freepik)
-
एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात.(Photo: Freepik)
-
तुम्ही खोबरेल तेल आणि कोरफड वेरा जेलने फेस मास्क बनवू शकता, यासाठी तुम्हाला एक चमचा खोबरेल तेल आणि एक चमचा एलोवेरा जेल चांगले मिक्स करावे लागेल. (Photo: Freepik)
-
त्यानंतर ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. (Photo: Freepik)
Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण