-
Skin Care Tips for summer : चेहऱ्यावर एक पिंपल दिसला तरी आपल्याला टेंशन येतं. उन्हाळ्याच्या हंगामात पिंपल्स, चिकटपणा आणि डाग सामान्य आहेत. (Photo: Freepik)
-
अशा परिस्थितीत, लोक खूप अस्वस्थ होतात आणि त्यातून सुटका करण्यासाठी बरेच प्रयत्न करतात. पण त्यांना आराम मिळत नाही, जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.(Photo: Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला या लेखातून असा एक रामबाण उपाय सांगणार आहोत जो तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करून तुम्हाला अधिक चांगले सौंदर्य देऊ शकतो.(Photo: Freepik)
-
मूग डाळीचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि मुरुम कमी करण्यासाठी मदत करते. तुम्ही मूग डाळ वापरून स्क्रब बनवू शकता. (Photo: Freepik)
-
मूग डाळीचा स्क्रब बनवण्यासाठी लागणारे साहित्य. मुग डाळ, मध, दही. (Photo: Freepik)
-
तुम्ही मूग डाळीपासून स्क्रब बनवू शकता. यासाठी तुम्हाला मूग डाळ स्वच्छ धुवावी. नंतर रात्री पाण्यात भिजत ठेवावी.(Photo: Freepik)
-
नंतर सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर दोन चमचे मूग डाळीमध्ये एक चमचा दही आणि एक चमचा मध घाला.(Photo: Freepik)
-
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यानंतर तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावू शकता.(Photo: Freepik)
-
असे आठवड्यातून १ ते २ वेळा करा. यामुळे चेहरा चमकदार दिसेल. काही लोकांना मूग डाळ वापरल्यास अॅलर्जी असू शकते. चेहऱ्यावर लाल रॅशेस, पिंपल्स किंवा ॲलर्जीसारखे काही दिसले तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(Photo: Freepik)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं