-
आजकाल आपला सर्वात जास्त वेळ फोन किंवा लॅपटॉप वापरण्यात जातो, यामुळे आपल्या डोळ्यांना हानी होते आणि सतत डोळ्यांवर भार येतो ज्यामुळे डोळ्यांची जळजळ होते.
-
आपल्या डोळ्यांच्या रक्षणासाठी आपण आहारात पौष्टिक घटकांचा समावेश केला पाहिजे, हे घटक आपल्याला निरोगी राहण्यासाठी मदत करतात.
-
जाणून घेऊया काही खाद्य-पदार्थ जे आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी प्रभावी आहेत.
-
तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. हे पदार्थ विशेषतः कॅरोटीनोइड्स नावाच्या अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात जे आपल्या डोळ्यांना आराम देऊन त्यांची काळजी घेते.
-
तुम्ही दररोज गाजर खाऊ शकता याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकते कारण गाजरामध्ये ‘बीटा-कॅरोटीन’ नावाचे घटक आहे, हे एक प्रकारचा व्हिटॅमिन ए आहे जो तुमच्या डोळ्यांना अंधारात चांगल्या प्रकारे पाहण्यास मदत करतो.
-
डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही आहारात फळांचा समावेश करू शकता.
-
आहारात भरपूर प्रमाणात कडधान्ये असल्याने तुमची दृष्टी नैसर्गिकरित्या सुरक्षित राहते.
-
तुम्ही कॅल्शियमचे प्रमाण असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे यामुळे तुमची डोळ्यांची दृष्टी सुरक्षित राहते. तुम्ही तुमच्या आहारात दूध आणि अंड्यांचे समावेश करू शकता.
-
मासे हे ओमेगा ३ फॅटी ऍसिडने समृद्ध असतात, जे तुमच्या शरीराला अनेक फायदे देतात आणि हे आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत देखील करतात.
-
ब्रोकोली मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असल्याने हे तुमच्या डोळ्यांना हानिकारक रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी मदत करते.
-
(All Photo:Unsplash)
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती