-
आपल्या शरीराला हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची गरज असते, लाल रक्तपेशींमधील प्रथिने हिमोग्लोबिनला तुमच्या रक्तवाहिन्यांमधून ऑक्सिजन तयार करायला मदत करते.
-
जर तुमच्या शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन नसेल, तर तुमच्या स्नायूंना प्रभावीपणे काम करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही.
-
लोहाच्या कमतरतेचे पहिले लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणे आणि शकरीरात अशक्तपणा असणे. तुमच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या लोह शरीरात कमी असल्यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो.
-
जर तुमची त्वचा नेमहीपेक्षा जास्त फिकट पडली असेल तर हे तुमच्या शरीरात लोहाची कमतरता दर्शवते.
-
लाल रक्तपेशींमधील हिमोग्लोबिन रक्ताला लाल रंग देते, त्यामुळे लोहाच्या कमतरतेमुळे रक्त कमी लाल होते म्हणूनच लोहाची कमतरता असलेल्या लोकांमध्ये त्वचेचा रंग नेमहीपेक्षा जास्त फिकट दिसतो.
-
लोह कमतरतेमुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो कारण शरीरात लोहाची पातळी कमी असल्यामुळे तुमचे शरीर अधिक ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न करतो, परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो.
-
तुम्हाला वारंवार होणारी डोकेदुखी हे देखील लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.
-
शरीरात पुरेसे ऑक्सिजन नसल्यामुळे त्वचा कोरडी पडणे आणि केस गळती होऊ शकते.
-
अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.
(All Photo:Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण