-
उन्हाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते. केसांतील कोंड्यामुळे टाळूला खाज येते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्यामुळे केसही कोरडे आणि निर्जीव होतात. कोंड्याच्या समस्येने त्रस्त असलेला प्रत्येक जण विविध शॅम्पू वापरून पाहतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जर तुम्हीही केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोपे घरगुती उपाय एकदा नक्की वापरून पाहा. यामुळे कोंड्याची समस्या दूर होईल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोंडा दूर करण्यासाठी पुढील नैसर्गिक हेअर मास्कचा उपयोग करून पाहा… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ॲपल सायडर व्हिनेगर आणि टी ट्री ऑइल – पाण्याच्या भांड्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर घाला आणि त्यात टी ट्री ऑइल (Tea Tree oil) तीन थेंब किंवा बदामाच्या तेल घाला व तुमच्या टाळूला मसाज करा. २५ मिनिटे असंच राहू द्या व शॅम्पूने केस धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल – एका मोठ्या बाउलमध्ये दोन अंडी फोडा त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घाला आणि ते पूर्णपणे मिक्स करा. हे मिश्रण तुमच्या केसांना आणि टाळूला लावा आणि १५ मिनिटे तसंच राहू द्या व शॅम्पूने केस धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोरफड जेल आणि ऑलिव्ह ऑइल – एक लहान वाटी कोरफड जेल घ्या आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑइल घाला. ते पूर्णपणे मिक्स करा आणि केसांना आणि टाळूला मालिश करा. ३० मिनिटे असंच राहू द्या व शॅम्पूने केस धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केळी आणि खोबरेल तेल – एका मोठ्या भांड्यात दोन केळी स्मॅश करा आणि एक चमचा खोबरेल तेल घाला. त्यानंतर तुमच्या केसांना आणि टाळूला लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या व शॅम्पूने केस धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दही आणि लिंबूचा हेअर मास्क – अर्धा लिंबू एक कप दह्यात पिळून नीट मिक्स करा. तुमच्या टाळूवर आणि केसांना ४० लावून ठेवा व नंतर शॅम्पूने केस धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)

DC vs MI: रोहित शर्माचा एक निर्णय अन् नवा चेंडू ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट, डगआऊटमधून हिटमॅन कसा ठरला गेमचेंजर?