-
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्ही अनेकदा ऐकली असतील. मुकेश अंबानी आणि गौतम अदानी याचं नाव नेहमी समोर येत असतो.
-
परंतु आज आपण श्रीमंत व्यक्तींबद्दल नाही तर श्रीमंत राजघराण्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आहे.
-
भारताला राजघराण्यांची मोठी परंपरा लाभली आहे. ही राजघराणी आज देखील तितकीच श्रीमंत आणि धनाढ्य आहेत, जितकी पूर्वी होती.
-
आजही काही भारतीय राजघराण्यांनी वारसा आणि लक्झरी यांनी भरलेली जीवनशैली स्वीकारली आहे. तर आज आपण अशाच राजघराण्यांबद्दल जाणून घेऊया.
-
मेवाड राजघराणे: मेवाड राजघराणे हे भारतातील सर्वात जुने राजघराणे आहे. अरविंद सिंह मेवाड घराण्याचे ७६ वे संरक्षक आहेत. ते एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.
-
वाडियार राजघराणे: वाडियार हे भारतातील शाही वंशातील सर्वात श्रीमंत वंशजांपैकी एक आहेत. दिवंगत महाराज श्रीकांतदत्त नरसिंहराज वाडियार आणि राणी प्रमोदा देवी यांना कोणतीही संतान नव्हती. यासाठी राणी प्रमोदा देवींनी आपल्या पतीच्या मोठी बहिणीचा मुलगा यदुवीर यांना दत्तक घेतले आणि वाडियार राजघराण्याचा वारस बनवले. स्कूपहूप अहवालानुसार, १०,००० कोटी रुपयांच्या अंदाजे संपत्तीसह यदुवीर आणि त्यांचे कुटुंब म्हैसूर पॅलेसमध्ये राहतात. याव्यतिरिक्त ते रॉयल सिल्क ऑफ म्हैसूर, एक प्रसिद्ध रेशीम ब्रँडचे मालक सुद्धा आहेत.
-
पतौडी नवाबाचे राजघराणे: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानचे दिवंगत वडील मन्सूर अली खान पतौडी यांनी पतौडी राज्याचे अंतिम नाममात्र शासक म्हणून काम केले. त्यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरशी लग्न केले आणि त्यांनी तीन मुलांना एकत्र वाढवले. सैफ अली खान आता पतौडीचा नवाब ही पदवी धारण करतो. तथापि, त्याला त्याच्या वडिलांकडून राजवाड्याचा वारसा मिळाला नाही. त्याऐवजी, त्याला ते हॉटेल्सच्या नीमराना ग्रुपकडून खरेदी करावे लागले, ज्यांच्यासोबत त्याच्या वडिलांनी पूर्वी १७ वर्षांच्या लीजची व्यवस्था केली होती.
-
जयपूरचे राजघराणे: महाराजा सवाई मानसिंह आणि त्यांची पहिली पत्नी मरुधर कंवर यांना पुत्ररूपात भवानी सिंह झाले. भवानी सिंहांचे लग्न पद्मिनीदेवींशी झाले होते. त्यांना दिया कुमारी ही एकुलती एक मुलगी आहे.नंतर दिया कुमारींचे लग्न नरेंद्र सिंहांशी झाले. त्यांना दोन मुले झाली पद्मनाभ सिंह आणि लक्ष्यराज सिंह, तर मुलगी आहे गौरवी. दिया सध्या सवाई माधोपूर येथून भाजपा आमदार आहेत.
-
जोधपूरचे राजघराणे: जोधपूरमधील हे सर्वात मोठे राजघराणे म्हणून ओळखले जाते. या राजघराणांचे वंशज गज सिंह यांच्याकडे उम्मेद नावाचे एक भवन आहे. या महालाला जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानांपैकी एक म्हणून सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांच्याकडे अनेक किल्ले आहेत.
-
गायकवाड राजघराणं: हे भारतातील मोठे राजघराणे आहे, ज्याचे वंशज समरजीत गायकवाड आहेत. ज्यांना महाग गाड्या बाळगण्याची आवड आहे. रियल इस्टेटमध्ये त्याचा अरबो रुपयांचा उद्योग आहे. महाराजा समरजितसिंग यांनी रणजी ट्रॉफीमध्ये त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व केले होते. स्कूपहूपच्या अहवालानुसार, त्याच्या वारसामध्ये २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता समाविष्ट आहे.
-
बिकानेरचं राजघराणं: महाराजा करणी सिंह आणि महाराणी सुशीला कुमारी यांची कन्या राजकुमारी राज्यश्री कुमारी या बिकानेरमधील प्रतिष्ठित लालगढ पॅलेसच्या सध्याच्या मालकीण आहेत. या राजकुमारीने वारशाचा उपयोग करून, राजवाड्याचा एक भाग एका भव्य हेरिटेज हॉटेलमध्ये बदलला आहे.
-
अशा प्रकारे आज आपण भारतातील सात श्रीमंत राजघराणे कोणते, याविषयी माहिती जाणून घेतले आहोत. (फोटो सौजन्य : instagram )
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”