-
काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर असे वेगवेगळे सुक्या मेव्याचे प्रकार आरोग्यासाठी फारच फायद्याचे असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्हाला माहिती आहे का ? काजू, बदाम, अक्रोड, मनुका, अंजीर यांबरोबरच ब्राझील नट (Brazil nut) खाण्याचेसुद्धा आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
ब्राझील नट’ हे दक्षिण अमेरिकेतील झाडापासून मिळतात. तसेच हे सॅलड, सॉस, स्मूदी व बटर यांसह विविध पदार्थांमध्ये वापरले जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
न्यूट्रिशनिस्ट आणि कंटेंट क्रिएटर दीपशिखा जैन यांनी अलीकडेच एका रीलमध्ये सांगितले की, हायपोथायरॉइडिझम असलेल्यांनी ब्राझील नट खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्याला अंडरॲक्टिव्ह थायरॉईडदेखील म्हणतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर या थिअरीची (Theory) पुष्टी करण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार, आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक, कनिक्का मल्होत्रा आणि बीएलके मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डायबिटीज, थायरॉईड, लठ्ठपणा व एंडोक्रायनोलॉजीचे वरिष्ठ संचालक डॉक्टर अशोक कुमार झिंगन यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ब्राझील नट खाण्यापूर्वी ते स्वच्छ भिजवून घ्यावेत. ब्राझील नट्समध्ये योग्य प्रमाणात सेलेनियम असते; जे हायपोथायरॉईड रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
ब्राझील नट्समध्ये सेलेनियमचे प्रमाण जास्त असते; जे शरीराच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असतात. जसे की, सेलेनियम थायरॉईडचे कार्य सुनिश्चित करते आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम प्रकारे कार्यरत ठेवण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दिवसातून फक्त दोन ब्राझील नट्स खाल्ल्याने तुमचे सेलेनियमचे प्रमाण प्रभावीपणे टिकवून ठेवण्यास किंवा वाढविण्यास मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण