-
सध्याच्या ऑनलाईन जगात इंटरनेटशिवाय कुणाचंही पान हलत नाही. सध्या वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन क्लासेसमुळे इंटरनेट कनेक्शनसाठी वाय-फाय राउटर महत्त्वाचे डिव्हाइस झाले आहे. (फोटो : Freepik)
-
स्मार्टफोनमधील इंटरनेटवर सर्व कामे शक्य नसल्यान ब्रॉडबँड कनेक्शन घ्यावे लागते. अशावेळेस वाय-फाय राउटरची गरज भासते. मात्र, अनेकदा राउटर व्यवस्थित काम करत नाही व याचा परिणाम इंटरनेटवर होतो. (फोटो : Freepik)
-
राउटर चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने देखील कनेक्टिव्हिटीची समस्या निर्माण होऊ शकते. अशाच काही टिप्सबद्दल जाणून घेऊया, ज्याद्वारे तुमचे वाय-फाय राउटर व्यवस्थित काम करेल व इंटरनेट देखील फास्ट चालेल. (फोटो : Freepik)
-
राउटरची फक्त जागा बदलली तरी तुमची अडचण दूर होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या लोकेशन्सवर राउटर ठेवल्याने चांगली स्पीड मिळते.(फोटो : Freepik)
-
वाय-फाय राउटरद्वारे मिळणाऱ्या स्पीडमध्ये मेटल अथवा भिंत अडथळा ठरू शकते. त्यामुळे कोणताही अडथळा नसेल अशा ठिकाणी राउटरला ठेवावे. तसेच, जमिनीवर ठेवणे देखील टाळावे.(फोटो : Freepik)
-
लक्षात ठेवा की, WiFi चं राउटर भितींवर किंवा टेबलवर काही उंचीवर ठेवलेलं असलं पाहिजे. यामुळे सिग्नल्स चांगल्या प्रकारे प्रसारित होण्यास मदत मिळते.(फोटो : Freepik)
-
वायफायचं राउटर रिफ्लेक्टिव्ह सरफेस जसं की, खिडकी किंवा आरशाजवळ असू नये असा प्रयत्न करा. यामुळे सिग्नल बाउंस होतं आणि इंटरपेरेन्स क्रिएट होतं.(फोटो : Freepik)
-
वाय-फाय राउटरला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जवळ ठेवू नये. टीव्ही, ब्लूटूथ हेडसेट, फ्रीज सारख्या इलेक्ट्रिक सामानापासून दूर ठेवावे. यामुळे अधिक चांगला सिग्नल मिळेल.(फोटो : Freepik)
-
चांगली कनेक्टिव्हिटी आणि स्पीड मिळवण्यासाठी आणखी काही गोष्टींकडेही लक्ष ठेवा. जकं की, राउटरच्या एन्टेनाची दिशा कशी आहे. फर्मवेयर अपडेट आहे की नाही, यासोबतच राउटर किती जुनं आहे. (फोटो : Freepik)
Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्ररकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…