-
मेथी आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु, केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. (Photo-Pixabay)
-
मेथीचे दाणे आरोग्याच्या दृष्टीने फार गुणकारी आहेत. मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी च्या पोषक तत्वाने मेथी दाण्याचे पाणी भरलेले आहे.
-
पण, तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? याच विषयावर जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ पी. एस. सुषमा यांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
-
जर तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमचे आरोग्य अनेक प्रकारे सुधारू शकते. मेथीचे दाणे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी फायद्याचे ठरतात. मेथीमध्ये विरघळणारे फायबरदेखील असते जे कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.
-
मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले आहे. याव्यतिरिक्त मेथी आतड्यांमधील कोलेस्ट्राॅलचे शोषण रोखण्यास मदत करते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
-
मेथीच्या अनेक आरोग्यदायी फायद्यांमुळे १४ दिवस ते खाल्ल्याने शरीरावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात. ते फायबर, प्रथिने, लोह आणि इतर महत्त्वपूर्ण घटकांनी समृद्ध आहेत.
-
पचनास मदत करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे, वजन कमी करण्यास प्रोत्साहन देणे आणि कोलेस्ट्राॅल कमी करणे यासाठी त्यांची ख्याती आहे.
-
मेथीच्या दाण्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, जे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवून देण्यास मदत करते. तसंच पोटात होणारी जळजळही यामुळे कमी होते.
-
तथापि हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, काही लोकांनी जास्त प्रमाणात बिया खाल्ल्या तर या दुष्परिणामांमध्ये अतिसार, मळमळ आणि क्वचित चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ शकते. (फोटो सौजन्य : freepik )

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल