-
Simple Exercise to Lower Back: दिवसभराच्या बैठ्या कामांनी अनेकदा आपली पाठ अवघडते. लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम असल्याने बसून काम करण्याशिवाय पर्याय नसतो. (Photo : Freepik)
-
सकाळी लवकर उठून- आवरून आपण जे कामाला सुरुवात करतो, ते संध्याकाळ आणि रात्र कधी होते तेही कळत नाही. रात्री आपण पाठ टेकतो तेव्हाच काय तो पाठीला आराम मिळतो.(Photo : Freepik)
-
त्यात पाठदुखी ही कोणत्याही वयातील व्यक्तीसाठी समस्या बनू शकते. तुम्हालाही पाठीत हलके दुखणे सतत होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्यावर वेळीच उपचार करा.(Photo : Freepik)
-
पाठीचे आरोग्य कसे सुधारू शकते यासंदर्भात आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.(Photo : Freepik)
-
खर्चीतून उठून थोडे पुढे सरकायचे. हात खुर्चीच्या पाठीपाशी ठेवायचे आणि कंबर वर उचलून उष्ट्रासन करतो त्याप्रमाणे करायचे. यामुळे पाठीचे स्ट्रेचिंग होते आणि खांदे, पायही बसून अवघडले असतील तर त्याचीही थोडी हालचाल होते. हे स्ट्रेचिंग २० सेकंदांसाठी करायचे.(Photo : Freepik)
-
आपल्या पाठीचा कणा सुस्थितीत राहण्यासाठी बसताना किंवा चालताना तो ताठ ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.खुर्चीवरून उठून घरातच वॉक घ्या. मसल्स स्ट्रेच करा, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होईल.(Photo : Freepik)
-
एकाच जागी जास्त वेळ बसणं टाळा. स्नायूंची हालचाल होण्यासाठी, त्यांना आराम मिळावा म्हणून काम करताना विश्रांती घ्या. मानेची हालचाल करा.(Photo : Freepik)
-
पाठीला आधार मिळेल अशाच खुर्चीचा बसण्यासाठी वापर करा. झोपताना पाठीला आधार मिळेल अशा टणक पृष्ठभागावर झोपा.(Photo : Freepik)
-
उंच टाचांच्या, हिल्सच्या चपला, बूट वापरणं टाळा. वजन नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.(Photo : Freepik)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण