-
बऱ्याच लोकांना दररोज कॉफी प्यायला आवडते आणि यामुळे कधीकधी एकापेक्षा जास्त वेळा कॉफीचे सेवन केले जाते.
-
जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने आपल्या शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते आणि याचे परिणाम विशेषतः आपल्या केसांवर होतात.
-
कॉफीचे अधिक सेवन केल्याने आपल्या शरीरातील ‘ॲड्रेनल्स’ कमकुवत होतात आणि यामुळे आपले केस गळतात.
-
कॅफिनच्या अतिसेवनामुळे शरीरातील हार्मोन्सचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
-
शरीरात कॅफिनच्या उच्च पातळीमुळे ‘कॉर्टिसॉल’चे प्रमाण वाढते, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरदेखील होऊ शकतो.
-
कॅफिनमुळे आपल्या शरीरात लोह आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण कमी होते. हे आवश्यक पोषक तत्व आपल्या शरीरात केसांच्या वाढीसह त्वचेचे रक्षणदेखील करते.
-
केसांच्या समस्या टाळण्यासाठी कॅफिनच्या सेवनाचे प्रमाण हे नियंत्रित केले पाहिजे.
-
तज्ज्ञांनुसार साधारणपणे कॉफीचे सेवन हे दररोज फक्त ४०० मिलीग्राम असले पाहिजे.
-
(Photos: Unsplash)

Pune Bus Rape Case : पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडेचा भाऊदेखील पोलिसांच्या ताब्यात; वकीलाने सांगितलं कारण