-
ज्योतिषशास्त्रानुसार, सर्व ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होतो.
-
काही दिवसातच देवगुरु वृषभ राशीतच प्रवेश करणार आहेत. १९ मे ला वृषभ राशीत शुक्र गोचर करणार आहेत. ज्यामुळे ‘गजलक्ष्मी राजयोग’ निर्माण होत आहे. जो खूप शुभ मानण्यात येतो.
-
वृषभ राशीमध्ये शुक्र आणि गुरुची युती १२ वर्षांनी होणार आहे. ही युती ११ जुनपर्यंत असणार आहे.
-
चला जाणून घेऊया ‘गजलक्ष्मी राजयोग’ बनल्याने कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो, जाणून घेऊया…
-
गजलक्ष्मी राजयोग बनल्याने मेष राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.
-
कर्क राशीच्या लोकांना गजलक्ष्मी राजयोग बनल्याने अच्छे दिन अनुभवता येऊ शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरु शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. तुम्हाला आकस्मिक धन प्राप्त होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.
-
गजलक्ष्मी राजयोग बनल्याने सिंह राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला रखडलेले पैसे मिळू शकतात आणि तुमच्या योजना यावेळी यशस्वी होऊ शकतात. मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख मिळू शकतं.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम))
Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश