-
ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) हा बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक मानला जातो. बुध ग्रहाने चाल बदलली तर याचा परिणाम प्रत्येक राशीच्या व्यक्तींच्या जीवनावर होतो.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेव मे महिन्यात दोन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. सर्वात आधी बुधदेव १० मे ला मेष राशीत प्रवेश करणार आहे. तर ३१ मे ला वृषभ राशीत गोचर करणार आहे.
-
प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपली रास बदलतो. बुध ग्रह हा महिन्यातून एकदा संक्रमण करतो. पण मे महिन्यात बुध देव दोनदा आपली राशी परिवर्तन करणार आहे.
-
बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया, कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
-
मे महिन्यातील बुधाचं दोनदा गोचर मेष राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकतो. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे.
-
बुधाचं दोनदा गोचर कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. यावेळी या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो.
-
सिंह राशीच्या लोकांना बुधदेवाच्या कृपेने अचानक धनलाभ होऊ शकतो. बुध संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदलही घडून येऊ शकतात. या काळात अडकलेली कामं मार्गी लागून आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images