-
उन्हाळ्यात त्वचा टॅन होणे एक सामान्य समस्या आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी अनेक जण सनस्क्रीनचा उपयोग करतात. पण तरीही चेहरा किंवा हात लगेच टॅन होऊन जातात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, तुम्हाला माहिती आहे का ? सनस्क्रीन व्यतिरिक्त हात टॅन होऊ नये म्हणून तुम्ही पुढील काही घरगुती उपायांचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नियमितपणे एक्सफोलिएट करा – सौम्य स्क्रब वापरा किंवा साखर आणि ऑलिव्ह ऑइल सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून स्वतःचे एक्सफोलिएटिंग मिश्रण घरीच बनवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लिंबाचा रस – ताज्या लिंबाचा काढलेला रस हाताला लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दहीचा मास्क – साधे दही हाताला लावा आणि २० ते ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर पाण्याने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बटाट्याची पेस्ट – बटाटा किसून त्याचा रस काढा नंतर कापसाच्या तुकड्याने रस हाताला लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काकडीचे तुकडे – काकडीचे तुकडे हातावर ठेवा आणि १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. टॅन कमी करण्यासाठी दररोज या उपायाची पुनरावृत्ती करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एलोवेरा जेल – तुमच्या हातांना एलोवेरा जेल लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर राहू द्या आणि सकाळी उठून स्वच्छ धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एका भांड्यात दूध घ्या आणि त्यात हात १५ ते २० मिनिटे भिजवा. नंतर पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित