-
प्रसिद्ध युट्यूबर (YouTuber) आणि इन्फ्लूएंसर आशिष चंचलानी नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चे असतो. आज कोणालाही त्याची वेगळी ओळख सांगण्याची गरज लागत नाही. (PHOTO – ashish chanchlani / Instagram)
-
आशिषने नेहमीच आपल्या अनोख्या टॅलेंट आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो अनेकांचा फिटनेस आयकॉन बनत आहे. (PHOTO – ashish chanchlani / Instagram)
-
आशिष चंचलानीने बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले. जे पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले.
-
त्याचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, त्याने इतक्या कमी वेळात एवढे वजन कसे काय कमी केले? जर तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल तर आपण त्याच्या वेटलॉस सिक्रेटबद्दल जाणून घेऊ…
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वजन कमी करण्यासाठी आशिष चंचलानीने अतिशय स्ट्रिक्ट डाएट तसेच जिम रूटीन फॉलो केले आहे.
-
चार महिने त्याने संतुलित आहार खाल्ला तसेच बाहेरील जंक फूडपासून पूर्णपणे दूर राहिला.
-
एकाच वेळी पोटभर जेवण्याऐवजी आशिष रोज थोड- थोडं जेवत होता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खाण्याच्या या पद्धतीमुळे पचनशक्ती वाढवून चयापचय वाढण्यास मदत होते, ज्यामुळे जास्त कॅलरीज बर्न होतात.
-
आशिष दररोज सुमारे ४ तास जिमिंग करत होता. ज्यामध्ये कार्डिओ ते स्ट्रेंथ ट्रेनिंग तसेच बॉक्सिंग, बॅटल रोप्स, सायकलिंग आणि रनिंग यांचा समावेश होतो.
-
आशिष चंचलानी याच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर ३ गोष्टी लक्षात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे.
-
पहिली गोष्ट म्हणजे इतरांच्या बोलण्याने नाराज होऊन स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे, लोक तुमची चेष्टा करतात म्हणून जर तुम्हाला स्वतःला बदलायचे असेल तर तुम्ही स्वतःला फार काळ पूश देऊ शकणार नाही. याशिवाय फक्त स्वतःसाठी आणि स्वत:च्या आनंदासाठी बदला.
-
दुसरे म्हणजे, घाई टाळा. आपण वर्षानुवर्षे वाढवत असलेले वजन केवळ ३ किंवा ४ महिन्यांत कमी करू शकत नाही. अशा परिस्थितीत, स्वत: ला डेडलाइन देणे थांबवा.
-
यात धैर्य सर्वात महत्वाचे आहे. या सर्वांशिवाय स्वतःचे महत्त्व समजून घ्या. स्वतःवर प्रेम करा, तरच तुम्हाला तुमची ताकद कळेल. (photo credit- (PHOTO – ashish chanchlani / Instagram, freepik)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”