-
उष्णतेमुळे अनेकदा आपल्याला पोटदुखी, आम्लपित्त आणि मळमळ अशा समस्या होतात, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. या समस्यांसाठी फायदेशीर असलेल्या फळा बद्दल जाणून घेऊया.
-
आवळ्यामध्ये भरपूर पोषक तत्व आणि व्हिटॅमिन-सी असते. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा आठपट जास्त व्हिटॅमिन-सी आणि बेरीच्या दुप्पट अँटीऑक्सिडंट असतात.
-
आवळा हे एक उत्कृष्ट रासायनिक टॉनिक देखील आहे, ज्यामुळे तुम्ही त्वचा तेजस्वी आणि चमकदार होते. आवळ्याच्या सेवनाने आपले ही रक्त शुद्ध होते.
-
आवळ्यामध्ये असलेले ‘गॅलिक ॲसिड’ आपल्याला होणाऱ्या पोटाच्या समस्यांपासून आपले रक्षण करते आणि ॲसिडिटी बरे करण्यास देखील मदत करते.
-
आवळ्यातील गुणधर्मांपैकी एक म्हणजे त्याचे ‘गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह एजंट’ यामुळे आपल्या शरीरातील पचनशक्ती सुधारते.
-
आवळ्याचे नियमित्त सेवन अल्सर या रोगाचा धोका कमी करते.
-
आवळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि याशिवाय आवळ्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
-
तज्ञांच्या मते आवळ्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी चे प्रमाण भरपूर आहे.

AFG vs AUS: अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे झाला रद्द, कोणत्या संघाने गाठली सेमीफायनल?