-
Mental Stress: तणाव हा जीवनाचा एक भागच आहे. चांगल्या कामगिरीसाठी थोडासा ताण चांगला आहे; परंतु सततचा ताण आरोग्यासाठी हानिकारक असतो. (Photo: Freepik)
-
ताणतणावामुळे इतर अनेक आजारांचा धोका वाढत असल्यामुळे तणावाचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. मनावर ताण येत असेल, तर तुम्ही घरीच काही गोष्टी करू शकता. (Photo: Freepik)
-
अलीकडील अभ्यासात असे आढळून आले की, योगाने इतर तणाव व्यवस्थापन तंत्रांच्या तुलनेत तणाव, नैराश्य व चिंता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होत आहे. (Photo: Freepik)
-
चला तर मग जाणून घेऊ कोणती योगमुद्रा तुम्हाला जास्त विचार करण्यापासून वाचवू शकते.योगमुद्रा आसन हे आसन केल्याने मन शांत होते आणि मेंदूला चांगला रक्तपुरवठा होण्यास मदत होते.(Photo: Freepik)
-
भुजंगासन केल्यानेही आपल्याला बरेच फायदे होतात. भुजंगासन हे मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त असे आसन आहे. (Photo: Freepik)
-
या आसनात पाठीच्या कण्यांवर ताण येतो. त्यामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होते. दीर्घकाळ काम केल्याने पाठीला लागलेली रग आणि दुखणे कमी होते.(Photo: Freepik)
-
श्वसनविषयक आणि पचनप्रक्रियेत सुधारणा होतात. मधुमेहींसाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरते.(Photo: Freepik)
-
वर सांगितल्याप्रमाणे रोज ३० ते ९० सेकंदांचा रोज सराव केला तरी ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.(Photo: Freepik)
-
भूतकाळ किंवा कोणी काय बोलले ते तुमच्या मनातून निघून जात नसेल आणि तुम्ही रात्रंदिवस त्याचाच विचार करीत राहिल्यास काही योगासनांमुळे तुमचे मन ‘रिलॅक्स फील’ करू शकते.(Photo: Freepik)

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ