-
पाणीपुरी, शेवपुरी, दही चाट, भेळ, रगडा पॅटिस आदी चाटचा कोणताही प्रकार समोर ठेवला तरी तो खाण्याची इच्छा प्रत्येकाला होते. चाट एक चवदार, स्वादिष्ट भारतीय स्ट्रीट फूड आहे आणि हा अनेकांच्या पसंतीचा आहे. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
पण, बरेच लोक आरोग्य आणि फिटनेस नियंत्रित ठेवण्यासाठी चाट खाणे सोडतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्हाला फिटसुद्धा राहायचं आहे आणि चाटसुद्धा खायचे असेल तर पुढीलप्रमाणे डॉक्टरांनी सांगितलेल्या काही गोष्टी आहेत ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पोषणतज्ज्ञ मुनमुन गणेरीवाल आणि हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ फिजिशियन सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांनी चाट खाण्याची योग्य वेळ, त्याचे फायदे आणि तोटे सांगितले आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बहुतेक चाट हे तळलेले असतात आणि त्यात मैदासुद्धा असू शकतो. त्यामुळे चाट खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ ही आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
घरच्या घरी चाट बनवण्याचा एक फायदा असा होईल, तुम्ही तुमच्या सोयीनुसार यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर पदार्थ वापरू शकता आणि चाटमध्ये तेल आणि मिठाचे प्रमाण कमी करू शकता.(फोटो सौजन्य: @Pixabay)
-
चाटमध्ये कॅलरी आणि फॅट्स जास्त असतील तर त्याकडे लक्ष द्या. तुम्ही चाटचे सेवन जास्त प्रमाणात तर करत नाही आहात, यावर तुमचे नियंत्रण असले पाहिजे. (फोटो सौजन्य: @Pixabay)
-
काही प्रकारचे चाट आरोग्यदायी असू शकतात. स्प्राउट्स, भाज्या आणि दही यांसारख्या पौष्टिक घटकांचा समावेश असलेल्या चाट प्रकारांची निवड करा.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
राज कचोरी, रगडा पॅटीस, छोले किंवा आलू टिक्की आदी पौष्टिक चाट पर्याय तुम्ही दुपारच्या जेवणात खाऊ शकता. त्यानंतर संध्याकाळी ५ नंतर चाट खाणे टाळा व सात ते पंधरा दिवसांमधून एकदा चाट खा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
निरोगी जीवनशैली राखण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. तुमच्या आवडत्या चाटमध्ये वापरल्या जाणार्या कॅलरी संतुलित करण्यासाठी तुम्हाला आवडेल आणि जमेल असा व्यायाम करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न