-
Coconut Lassi Recipe: उन्हाळा सुरू होताच शरीराला थंडावा देण्यासाठी लस्सी प्यायला बऱ्याच लोकांना आवडते. तुम्ही आजवर दही आणि फळांपासून बनवलेल्या अनेक प्रकारच्या लस्सी प्यायल्या असतील. (फोटो : Freepik)
-
पण आज आम्ही तुम्हाला अशा लस्सीबद्दल सांगणार आहोत जी फक्त टेस्टसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.या रेसिपीचे नाव आहे कोकोनट लस्सी.(फोटो : Freepik)
-
नारळाची लस्सी नारळाच्या दुधात किंवा नारळाचे तुकडे करून दही मिसळून लस्सी बनवली जाते, परिणामी एक मलईदार आणि ताजेतवाने पेय मिळते. हे पेय प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने आणि निरोगी वाटेल.(फोटो : Freepik)
-
नारळाची लस्सी बनवण्यासाठी साहित्य, ३०० ग्रॅम दही, २ चमचे फ्रेश क्रीम, चिमूटभर काळी मिरी पावडर, १/२ चमचा बुकनु पावडर. (फोटो : Freepik)
-
३ (४ चमचे) साखर, १ चौथा चमचा पांढरेमीठ (पर्यायी), १ तृतीयांश कप ताजे नारळ, २ चमचे ताजे किसलेले नारळ, १ कप दूध, काही बर्फाचे तुकडे (फोटो : Freepik)
-
प्रथम मिश्रणाचे भांडे घ्या आणि त्यात प्रथम दही आणि साखर घाला. नतरं दोन चमचे फ्रेश क्रीम, चिमूटभर काळी मिरी पावडर, अर्धा चमचा बुकनु पावडर, तीन चार चमचे साखर, एक चौथा चमचा पांढरे मीठ (पर्यायी), एक तृतीयांश कप ताजे नारळ, अणि एक कप दूध घाला.
-
मिक्सरच्या भांड्यात एक मिनिट मिसळा. आता सर्व्हिंग ग्लासेसमध्ये लस्सी फिरवून घ्या आणि त्यात थोडे चिरलेले खोबरे आणि बर्फाचे तुकडे घाला.(फोटो : Freepik)
-
तुमची कोकोनट लस्सी तयार आहे. हे तुम्ही एखाद्या ग्लास मध्ये किंवा त्या नारळात देखील टाका आणि थंड थंड सर्व्ह करा (फोटो : Freepik)
-
अशाप्रकारे झटपट अशी कोकोनट लस्सी तुम्ही घरच्या घरी तयार करु शकता. (फोटो : Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”