-
Bharti Singh Health Update: कॉमेडियन भारती सिंगलाची प्रकृती खालावल्याने काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भारती सिंगने स्वतः याबाबत आपल्या एका व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे. तीन दिवसांपासून भारतीची तब्येत बिघडली होती आणि तिथे तिच्या शस्त्रक्रिया पार पडली आहे, नेमकं भारतीला काय झालं होतं व तिने याबाबत काय माहिती दिली आहे हे पाहूया..
-
व्हिडीओच्या सुरुवातीला भारती सिंग म्हणते की अशी परिस्थिती दाखवू नये पण जर व्हिडीओ येत नसतील तर तुम्ही विचारणार आणि कारण सांगणे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी सांगतेय की पोटात खूप वेदना होत असल्याने मी रुग्णालयात आले होते आणि इथे चाचण्यांमध्ये मला पित्ताशयातील खड्यांचा त्रास असल्याचे निदान झाले.
-
सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याने पोटात दुखत असावं असा तिचा अंदाज होता पण चाचण्यांमधून तिच्या पित्ताशयात खडे झाल्याचे व काही खडे हे शिरेत अडकल्याचे सुद्धा निदान झाले होते. तिने काहीही खाल्ले किंवा प्यायले तरी तिला असह्य वेदना व उलट्या व्हायच्या.
-
अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंग सध्या शोपासून दूर आहे. अभिनय आणि कॉमेडीसह भारतीला रायफल शूटिंगचीही खूप आवड आहे. रायफल शूटर म्हणून नॅशनल स्तरावरील स्पर्धांमध्येही तिने सहभाग घेतला आहे.
-
जेव्हा भारतीने इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हापासून तिला जास्त वजनामुळे अनेक टोमणे, नकार आणि संघर्षांचा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही आणि आपल्या कौशल्याच्या जोरावर एक वेगळे स्थान मिळवले. तसेच लाखो हृदयांच्या चाहत्यांमध्ये हक्काची जागा निर्माण केली
-
भारती सिंगने 2008 साली ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर शो’ या रिॲलिटी शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली.
-
भारती सिंगने कॉमेडियन हर्ष लिंबाचियाशी लग्न केले आणि या लग्नानंतर तिला एक सुंदर मूल आहे. हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांची पहिली भेट कॉमेडी सर्कसच्या सेटवर झाली होती.आता दोघे मिळून आपले एक युट्युब चॅनेल सुद्धा चालवतात
-
डिसेंबर २०१७ मध्ये हर्ष आणि भारती सिंग कायमचे एकत्र आले. या लग्नातून या जोडप्याला लक्ष्य नावाचा मुलगा आहे. पण सगळे त्याला गोला म्हणत.
-
भारती सिंग देशातील सर्वात श्रीमंत विनोदी कलाकारांपैकी एक आहे. महिन्याला सुमारे 25 लाख कमावणाऱ्या भारतीची एकूण संपत्ती २३ कोटींच्या आसपास आहे. वृत्तांनुसार तो वर्षाला 3 कोटी रुपये कमावते. (फोटो: इन्स्टाग्राम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच