-
How to Remove tanning त्वचा काळवंडण्याची अनेक कारणे असतील पण याकडे थोडे लक्ष दिले तर ही समस्या दूर होऊ शकते. (Photo: Freepik)
-
उन्हाळ्यात बहुतेक लोकांचे हात-पाय काळे होऊ लागतात, हे टाळण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. जर तुम्हालाही टॅनिंगचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.(Photo: Freepik)
-
घरात उपलब्ध असलेल्या गोष्टींचा वापर करुन तुम्ही हात-पायाची त्वचा उजळवू शकता, चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.(Photo: Freepik)
-
उन्हाळ्यात हात-पाय काळे होणे ही एक सामान्य समस्या आहे. हे टाळण्यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. जर तुम्ही सतत उन्हात असाल तर दर २ तासांनी सनस्क्रीन वापरा. (Photo: Freepik)
-
दिवसातून किमान दोन ते तीन वेळा चेहरा आणि हात पाय थंड पाण्याने धुवा. यामुळे शरीरातील धूळ, माती आणि घाण निघून जाईल.(Photo: Freepik)
-
याशिवाय कोरफड जेल, दही, लिंबाचा रस, बेसन आणि हळद या नैसर्गिक घटकांचा वापर करा. या गोष्टी मिक्स करून १५ मिनिटे चेहऱ्यावर लावा, त्यानंतर चेहरा धुवा.(Photo: Freepik)
-
उन्हात बाहेर जाताना गडद रंगाचे कपडे घालू नका. त्याऐवजी हलक्या रंगाचे आणि सैल सुती कपडे घाला. याशिवाय तुमचा चेहरा आणि अंग उन्हापासून वाचवण्यासाठी तुम्ही टोपी आणि सनग्लासेस लावू शकता.(Photo: Freepik)
-
लक्षात ठेवा की तुम्हाला दिवसभरात ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे लागेल, यामुळे त्वचा हायड्रेट राहील. धूम्रपान आणि अल्कोहोल टाळा, कारण ते टॅनिंग वाढवते. (Photo: Freepik)
-
या सर्व गोष्टी करूनही जर तुमच्या हात-पायातील काळेपणा दूर होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(Photo: Freepik)

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय