-
लवंग (Cloves) आपल्या घरात आढळणारी एक सामान्य गोष्ट आहे. दैनंदिन आहारात बरेचसे पदार्थ हे लवंगीशिवाय अपुरे आहेत म्हणून प्रत्येक घरात लवंग आढळतेच.
-
मसाल्यांमधील लवंग ही औषधी आणि महत्त्वपूर्ण घटकांनी भरलेली असून ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
-
लवंग मसाल्याप्रमाणे काही गोडाच्या पदार्थांमध्ये देखील वापरली जाते. लवंग दिसायला अगदी छोटी असली तरी तिचे औषधी गुणधर्म अतिशय मोठे आहेत.
-
पण रोज एक-दोन लवंग चघळल्या तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? तुम्हाला माहिती आहे का? याच विषयावर डॉ. रुपी औजला यांनी इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे, त्याबाबत जाणून घेऊया…
-
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. लवंगचे सेवन केल्याने इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून आराम मिळू शकतो.
-
लवंगात युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे फ्री रॅडिकल्स, हृदय, मधुमेह आणि कर्करोगाचा धोका कमी करते.
-
लवंगाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटदुखी, गॅस, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. यामध्ये असणाऱ्या पोषक तत्वांमुळे पचनाला मदत होते.
-
लवंगाच्या सेवनामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. लवंगामध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म असतात, जे तोंडातील सूक्ष्म बॅक्टेरिया नष्ट करतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.
-
जळजळ आणि बॅक्टेरियाची वाढ कमी करून, लवंग निरोगी हिरड्या निर्माण करण्यात योगदान देऊ शकते, हिरड्यांच्या आजारांच्या वाढीस प्रतिबंध किंवा मंद करू शकते.
-
रोज एक ते दोन लवंग अशा थोड्या प्रमाणात वापरणे फायदेशीर ठरू शकते. आरोग्याच्या फायद्यासाठी तुम्ही लवंगाचा वापर चहा, भाजलेल्या पदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये करु शकता.
-
गर्भवती महिला, यकृताचा आजार असलेल्या व्यक्ती आणि रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी लवंग सावधपणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावी.
-
(फोटो सौजन्य : freepik)

आजचे राशिभविष्य: मार्च महिन्याचा पहिला दिवस तुमच्यासाठी कसा असणार? ‘या’ राशींना जोडीदाराची उत्तम साथ व भागीदारीत होईल लाभ