-
Benefits Of Eating Poha With Lemon: छान वाफाळत्या पोह्यांची डिश, त्यावर भुरभुरलेली कोथिंबीर, ओलं खोबरं, शेव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबाचा रस, तोंडाला पाणी सुटेल अशी पोह्यांची रेसिपी जितकी सोपी आहे तितकी आरोग्यदायी असते
-
सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह प्रशिक्षक, कन्निका मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पोह्यांवरील काही थेंब लिंबाचा रस त्याचे पोषण वाढवू शकतो. असं का? चला जाणून घेऊया..
-
मल्होत्रा सांगतात की, लिंबाचा रस व्हिटॅमिन सीचा अंश जोडतो, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि लोह शोषणास मदत होते. शिवाय पोहे बनवताना त्यात वापरलेल्या डाळी, शेंगदाणे हे प्रथिने जोडतात तसेच काजू, सुकामेवा हे निरोगी फॅट्स जोडू शकतात.
-
पोह्यांवर लिंबाचा रस टाकण्याचे फायदे सांगायचे तर पोह्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) साधारणपणे कमी ते मध्यम श्रेणीत (३८ ते ६४ दरम्यान) असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करू शकतो
-
पोह्यातील फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते, तर लिंबाचा रस पचनास मदत करू शकतो व व्हिटॅमिन सीचा डोस प्रदान करू शकतो, जो संपूर्ण आरोग्य सुदृढ राखण्यास मदत करू शकतो
-
पोहे खाताना आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे की, पोहे हा कार्ब्सचा स्रोत आहे त्यामुळे सेवन करताना प्रमाणाचे भान राखणे आवश्यक आहे. साधारण एका वेळी मूठभर पोहे खाणे योग्य ठरेल
-
संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पोह्याचा आस्वाद घ्या, याला तुमचे नियमित जेवण बनवू नका
-
पोह्यातील प्रथिने वाढवण्यासाठी चिरलेल्या भाज्या (मटार, गाजर), चणाडाळ किंवा उकडलेले अंडे घालू शकता. आरोग्यदायी फॅट्स मिळवण्यासाठी बदाम, सूर्यफूल बिया किंवा फ्लेक्ससीड्स, काजू घालू शकता.
-
रिफाईंड तेलांऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा तिळाचे तेल यांसारखे हृदयासाठी फायदेशीर तेल निवडावे. साखर किंवा शेव, भज्या असे पदार्थ पोह्यांवर टाकू नका यामुळे विनाकारण फॅट्स वाढू शकतात. त्याऐवजी आपण कोथिंबीर भुरभुरून नक्की घालावी. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच