-
ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते.
-
ज्योतिषशास्त्रामध्ये गोचर फार महत्त्वाचं समजलं जातं. ग्रहांच्या राशी परिवर्तनाला गोचर म्हणतात. सुख, संपत्ती, वैभव, ऐषाराम आणि ऐश्वर्याचा कारक असलेल्या गुरूचा राशी बदल अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरतो.
-
आता शुक्रदेवाच्या वृषभ राशीत गुरुदेवाने गोचर केलं आहे. जे २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत.
-
त्यामुळे गुरुदेवाच्या कृपेने येणारे ३७२ दिवस काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया या भाग्यशाली राशी कोणत्या…
-
देवगुरुच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते.
-
सिंह राशीच्या लोकांना देवगुरुच्या कृपेने जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. नोकरदार लोकांना करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.
-
देवगुरुच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना अनेक फायदे मिळू शकतात. अपूर्ण योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या कालावधीत देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम) )
२७ बॅग, १७ बॅट, २५० किलोचं सामान! भारताच्या स्टार क्रिकेटरचा ऑस्ट्रेलियात भलताच पराक्रम, BCCIला बसला लाखोंचा फटका