-
आपली त्वचा ही अनेक थरांनी बनलेली असते या थरांमध्ये नवे नव्या पेशी सतत बनत असतात आणि नष्ट होत असतात. ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसूलाग तो म्हणूनच त्वचेवर वरचेवर स्क्रब करणं गरजेचं असतं. (फोटो : Freepik)
-
स्क्रबिंग केल्यावरच त्वचा अॅक्टिव्ह होते आणि इतर प्रोडक्ट्स योग्य प्रकारे शोषून घेऊ शकते, परंतु अनेकदा स्क्रब करताना आपण मोठ्या चुका करतो.(फोटो : Freepik)
-
अनेक वेळा पार्लरमध्येही चुकीच्या पद्धतीने एक्सफोलिएशन केले जाते, त्यामुळे चेहऱ्याचा बाहेरचा थर खराब होतो आणि पिंपल्ससारखे डाग आता दिसू लागतात.(फोटो : Freepik)
-
आज आपण जाणून घेणार आहोत की स्क्रब करण्याची योग्य पद्धत कोणती आहे तसेच स्क्रबिंग किती वेळ करावं तेही जाणून घेऊया.(फोटो : Freepik)
-
आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा स्क्रबिंग करणे योग्य मानले जाते. स्क्रबिंग करण्यासाठी बोटावर स्क्रब घ्या आणि त्याला चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमधे अप्लाय करा. आणि चेहऱ्यावर स्क्रबिंग फक्त दोन ते तीन मिनिटेच करा. (फोटो : Freepik)
-
जास्त स्क्रबिंग केल्याचे चेहऱ्याची बाहेरची त्वचा डॅमेज होऊ लागते. स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्याला थंड्या पाण्याने धुवून घ्या. (फोटो : Freepik)
-
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही आठवड्यातून २-३ वेळा स्क्रब करू शकता.(फोटो : Freepik)
-
ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी आठवड्यातून १ ते २ वेळा स्क्रब वापरावा.(फोटो : Freepik)
-
स्क्रबिंग करताना चेहरा जोरात घासणार नाही याची काळजी घ्या, असे केल्याने त्वचेला जळजळ होऊ शकते.(फोटो : Freepik)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल