-
लहानमुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे ‘चीज’. मॅगी, सँडविच, पास्ता, डोसा आणि बऱ्याच काही पदार्थांची चव वाढविण्यासाठी किंवा सजावट करण्यासाठी ‘चीज’ आवर्जून घातले जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, चीज आरोग्यासाठी हानिकारक आहे असे सांगितले जाते. कारण- यात फॅट्स, सोडियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे साधारणपणे आठवड्यातून फक्त एकदाच चीज खावे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, डिजिटल क्रिएटर डॉक्टर एरिक बर्ग म्हणतात की, दररोज चीजच्या सेवनाचेही महत्त्वपूर्ण फायदे आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
प्रक्रिया केलेले चीज न खाता, शेळी आणि मेंढीच्या चीजच्या (goat and sheep cheese) सेवन करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बकरी आणि मेंढी यांच्या दुधापासून तयार केले जाणारे चीज हे सर्वोत्कृष्ट चीज आहे. मेंढी आणि शेळीच्या चीजमध्ये A2 केसीन असते. या प्रथिनांमुळे तुमच्या पचनसंस्थेत कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जगातील काही वृद्ध लोक मेंढ्या आणि बकरीचे चीज खातात. सर्वसाधारणपणे गाईच्या दुधात सुमारे ३.८ ते ४ टक्के लॅक्टोज असतात; तर मॉझरेला चीज किंवा कॉटेज चीजमध्ये ४% लॅक्टोज असतात. पण, शेळी किंवा मेंढीच्या चीजमध्ये ०.५ टक्का लॅक्टोज असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ‘द इंडियन एक्स्प्रेसने’ DHEE सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ व पोषणतज्ज्ञ शुभा रमेश एल. यांच्याशी संवाद साधला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर डॉक्टरांनी असे सांगितले की, शेळीचे चीज आणि मेंढीचे चीज हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत; जे गाईच्या दुधापासून किंवा इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या मांसाच्या प्रथिनांशी तुलना करतात. हे चीज सामान्यत: संपूर्ण प्रोटीन प्रोफाइल म्हणून ओळखले जाते; ज्यामध्ये शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेल्या सर्व ॲमिनो ॲसिडचा समावेश असतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्याव्यतिरिक्त हे चीज शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते; ज्यामुळे तो स्नायूंच्या दुरुस्ती आणि मजबुतीसाठी दैनंदिन आहाराचा एक फायदेशीर घटक ठरतो. पण, त्यांनी हेदेखील सांगितले की, शेळी आणि मेंढीच्या चीजचा संतुलित आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. पण, त्यांच्यातील चरबी आणि सोडियमचे प्रमाण लक्षात घेऊन, ते कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

VIDEO: “खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला” नवरीने केला असा डान्स की नवरदेव झाला लाजून लाल