-
एखादी व्यक्ती किंचाळत असेल किंवा सतत ओरडत असेल, तर आपल्याला वैताग येतो; पण तुम्हाला माहीत आहे का भावनिकदृष्ट्या निरोगी आणि तणावमुक्त राहण्यासाठी ओरडणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला हे वाचायला विचित्र वाटेल; पण संशोधनातून असे समोर आले की ओरडल्यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येतात. (Photo : Freepik)
-
पालघर येथील अधिकारी लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे फिजिशियन सल्लागार डॉ. दीपक पाताडे यांनी ओरडण्याचे फायदे सांगितले आहेत. (Photo : Freepik)
-
डॉ. पाताडे सांगतात, “ओरडणे हा कॅथॉरिसिसचा एक प्रकार म्हणून काम करतो. कॅथारिसिस म्हणजे भावना व्यक्त करण्याची पद्धत होय. ओरडल्यामुळे मानसिक तणाव दूर होतो. मनातील भावना ओरडून व्यक्त केल्यामुळे तुमच्या मनाला आराम मिळतो आणि तुम्ही तुमच्या भावनांवर चांगले नियंत्रण मिळवू शकता.” (Photo : Freepik)
-
ओरडणे हे वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकते. काही प्रकारांमध्ये जेव्हा व्यक्ती ओरडते त्यावरून लक्षात येते की, त्यांना उपचाराची गरज आहे. अशा वेळी रुग्णाला जुन्या किंवा बालपणीच्या वाईट गोष्टी किंवा अनुभव पुन्हा आठवून ओरडण्यास सांगितले जाते आणि त्याशिवाय त्यांना ओरडण्यासाठी खास खोली दिली जाते; ज्याला वैद्यकीय भाषेत ‘स्क्रीम रूम’ म्हणतात. यांसारख्या उपचार पद्धतीमुळे रुग्ण लवकर मानसिक तणावातून बाहेर पडतो. (Photo : Freepik)
-
असे ओरडणे आरोग्यासाठी चांगले आहे; पण एखाद्या चुकीच्या ठिकाणी तुम्ही रागाच्या भरात किंवा आक्रमकपणे ओरडत असाल किंवा ओरडत असाल, तर नकळतपणे तुम्ही उपचार पद्धतीचे महत्त्व कमी करीत आहात. (Photo : Freepik)
-
ओरडल्यामुळे मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. डॉ. पाताडे यांनी ओरडण्याचे आपल्या शारीरिक आरोग्यावर कसे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात, याविषयी सांगितले आहे. ओरडल्यामुळे तणाव, मानसिक वेदना कमी होतात; पण खूप जास्त ओरडल्यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. (Photo : Freepik)
-
जेव्हा तुम्ही ओरडता, तेव्हा तुमचा आवाज ताणला जातो आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो त्याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. गायक आणि शिक्षक जे वारंवार त्यांच्या आवाजाचा वापर करतात. त्यांना व्होकल कॉर्ड नोड्युल (Vocal cord nodules)आजार होण्याची शक्यता असते. (Photo : Freepik)
-
डॉ. पाताडे यांनी ओरडणे संयमितपणे भावना व्यक्त करण्यासाठी वापरल्यास तणावमुक्त करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे सांगितले आहे. पुढच्या वेळी तुम्हाला मनाच्या शांततेसाठी ओरडण्याची इच्छा होईल तेव्हा एक सुरक्षित जागा शोधा (Photo : Freepik)
-
लक्षात ठेवा, ओरडणे ही उपचार पद्धत वाद निर्माण करण्यासाठी नाही, तर भावना व्यक्त करण्याचा तो एक पर्याय आहे. जर तुम्ही दीर्घकाळ तणावात असाल किंवा मानसिक आजाराशी संघर्ष करीत असाल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. (Photo : Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल