-
ज्योतिष शास्त्रात, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो.
-
वैभव, ऐश्वर्य, सुख, समृद्धी आणि ज्ञानाचा कारक मानल्या जाणाऱ्या गुरूच्या हालचालीत बदल होतो तेव्हा देश आणि जगावरही त्याचा परिणाम दिसून येतो.
-
१ मे २०२४ रोजी दुपारी देवगुरूने मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश केला आहे. त्याचप्रमाणे देवांचा गुरू ७ मे रोजी रात्री १०.०८ वाजता वृषभ राशीत अस्त झाला आहे. यावेळी ६ जून रोजी गुरुचा उदय होणार आहे.
-
देवगुरुच्या अस्तामुळे काही राशी आहेत ज्यांना भरपूर लाभ मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया गुरूच्या अस्तामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ होऊ शकतो. पाहा तुमची रास आहे का यात…
-
देवगुरूच्या अस्तामुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचे या काळात पूर्ण फळ मिळू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. उत्पन्नाचे नवीन मार्ग तुम्हाला सापडू शकतात. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.
-
देवगुरूच्या अस्तामुळे कन्या राशीच्या लोकांना चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक आणि शुभ परिणाम दिसून येऊ शकतात. तुमच्या कामाबद्दल तुमचे कौतुक होऊ शकते. नोकरदारांना बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.
-
देवगुरूच्या अस्तामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. पैशांचा ओघ चहूबाजूने असू शकतो. अचानक झालेल्या धनलाभामुळे तुमचं बँक बॅलेन्समध्ये झपाट्याने वाढू शकतो. ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळू शकतो. तुम्हाला करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…