-
प्रत्येकाला निरोगी आयुष्य जगावसं वाटतं, पण दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात स्वत:च्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अशात व्यायाम करण्याची एक दीनचर्या ठरवली तर अधिक सोपे जाते; पण ही व्यायाम करण्याची दीनचर्या काही ठराविक महिन्यानंतर बदलावी का? (Photo : Freepik)
-
बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की दीर्घ कालावधीसाठी नियमित एका पद्धतीचा व्यायाम करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तर मग व्यायामाची दीनचर्या बदलणे खरंच चांगले आहे की नाही? (Photo : Freepik)
-
दीनचर्या बदलल्यामुळे तुम्हाला व्यायामाचा कंटाळा येणार नाही आणि तुम्ही व्यायाम करणे थांबवणार नाही. तुम्हाला नवीन व्यायामाची दीनचर्या आवडू शकते (Photo : Freepik)
-
व्यायामाचे वेगवेगळे प्रकार आपल्या स्नायूंवर काम करतात, त्यामुळे तुम्ही व्यायामामुळे निरोगी आणि तंदुरुस्त राहाल. (Photo : Freepik)
-
एखादी गोष्ट वारंवार केल्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. व्यायामाची दीनचर्या बदलल्याने शरीरावरील ताण कमी होऊ शकतो. (Photo : Freepik)
-
नवीन व्यायाम शिकताना सुरुवातीला कठीण वाटू शकते, पण योग्यरित्या शिकणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही एका विशिष्ट कालावधीनंतर व्यायामाची दीनचर्या बदलत असाल तर योग्यरित्या व्यायाम शिकताना सुरुवातीला त्रास होऊ शकतो. (Photo : Freepik)
-
जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करता तेव्हा स्नायूंवर ताण पडतो. सुरुवातीला स्नायू कमकुवत असतात, त्यामुळे थोडा जरी व्यायाम केला की दुखतात; पण काही दिवसांमध्ये स्नायू अधिक कार्यक्षम बनतात. (Photo : Freepik)
-
जर तुम्ही सतत एकच एक व्यायाम करत असाल तर तुमच्या स्नायूंना या व्यायामाची सवय होते, त्यामुळे स्नायूंमध्ये बदल दिसून येत नाही. (Photo : Freepik)
-
दीनचर्येत बदल करणे गरजेचे आहे. नवीन व्यायाम हे स्नायूंसाठी एक नवीन आव्हान असते. या आव्हानांवर मात करताना स्नायू अधिक मजबूत होतात, पण तुम्ही सतत व्यायाम बदलत असाल तर तुमच्या स्नायूंना नवीन शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशावेळी समतोल राखणे महत्त्वाचे असते. (Photo : Freepik)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल