-
वैदिक ज्योतिष गणनेनुसार, देवगुरु बृहस्पती हे संतान, जीवनसाथी, धन, संपत्ती, मार्गदर्शक, प्रशासक, शिक्षण, ज्योतिष, धर्म, उच्च पद इत्यादींचा कारक मानले गेले आहेत.
-
गुरु हा नेहमीच लाभदायक ग्रह मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रहाची राशी बदलते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि सतत बदलणाऱ्या जगावर होतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा उदय जूनमध्ये होणार आहे. देवगुरुचा जून महिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत उदय होणार आहे. ज्यामुळे ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ निर्माण होणार आहे.
-
यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी गुरू ग्रहाचा उदय अक्षय फलदायी ठरेल.
-
देवगुरुच्या उदयमुळे मेष राशीच्या लोकांना हातात चांगला पैसा मिळण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता अधिक आहे. चांगली बढती मिळण्याची शक्यता असल्याने मोठा धनलाभ होऊ शकतो. एकापेक्षा जास्त व्यवसायात गुंतवणूक करुन तुम्ही लाभ मिळवू शकता.
-
देवगुरुच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल आणि त्यांची सर्व कामे मार्गी लागू शकतात. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात.
-
देवगुरुच्या उदयामुळे धनु राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांमधून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी कानी पडू शकते. नवीन नोकऱ्यांसाठी ऑफर येऊ शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो : सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…