-
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी, भाज्यांचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्त्व असतात. (Photo: Freepik)
-
पण तुम्हाला माहित आहेत का या भाज्यांचा वापर केवळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी नाही तर तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी देखील वापरला जाते. (Photo: Freepik)
-
भाज्यांमुळे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी भाज्या देखील खूप प्रभावी आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोबीच्या भाजीचा फेस पॅक बनवण्याच्या काही सोप्या पद्धती (Photo: Freepik)
-
तुमचा चेहरा सुंदर बनवायचा असेल तर तुम्ही कोबीपासून बनवलेला फेस पॅक वापरू शकता. कोबी खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच चेहऱ्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. (Photo: Freepik)
-
आज आम्ही तुम्हाला कोबीपासून बनवलेल्या काही सोप्या आणि प्रभावी फेस पॅकबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा चेहरा उजळवू शकता. चला जाणून घेऊया फेस पॅक बनवण्याची पद्धत. (Photo: Freepik)
-
कोबीपासून फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे कोबीचा रस घ्यावा लागेल, त्यात एक चमचा मध आणि चिमूटभर हळद घालावी लागेल. (Photo: Freepik)
-
ही पेस्ट तयार करून तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, त्यानंतर २० मिनिटांनी धुवा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचे लक्षात ठेवा. (Photo: Freepik)
-
तुम्ही कोबी आणि दही यांचा फेस पॅकही बनवू शकता. २ टेबलस्पून कोबीच्या रसात १ चमचा दही आणि १/२ चमचे बेसन मिसळावे लागेल. (Photo: Freepik)
-
. ही पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा.हा फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करून घ्या आणि पॅच टेस्ट करा. काही लोकांना त्याची ऍलर्जी असू शकते.(Photo: Freepik)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल