-
आनंद असो किंवा तणाव चहाप्रेमींना चहा, तर कॉफी प्रेमींना कॉफी वेळेत हवी. गरामागरम चहा तर मिटिंगसाठी कॉफीचा आस्वाद घेणारे आपल्यातील बरेच जण आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, चहा आणि कॉफीचे अतिसेवन करणे प्रत्येकाने टाळलं पाहिजे. कारण – त्यात “कॅफिन” असते; ज्याचा मज्जासंस्थेवर परिणाम होतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
१५० मिली कप कॉफीमध्ये ८० ते १२० मिलीग्राम कॅफिन, इन्स्टंट कॉफीमध्ये ५०-६५ मिलीग्राम आणि चहामध्ये ३० ते ६५ मिलीग्राम कॅफिन असते. तर ICMR ने दररोज फक्त ३०० मिलीग्राम कॅफिनचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्ली येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉक्टर विकास जिंदाल यांच्याशी चर्चा केली आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्याने शरीरातील लोहासारखी महत्त्वाची खनिजे शोषण्यास प्रतिबंध येऊ शकतो; ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
जेवणाच्या किमान एक तास आधी किंवा नंतर चहा, कॉफी ही पेय न पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. कारण त्यात टॅनिन नावाचे संयुग असतात. टॅनिन मानवी शरीराच्या लोह शोषण्याच्या कामात व्यत्यय आणू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तसेच कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाची अनियमिततादेखील होऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
दुधाशिवाय चहा घेणे योग्य आहे का?
दुधाशिवाय चहा घेणे पोषक तत्वांच्या शोषणाशी संबंधित काही समस्या कमी करू शकते. कारण दुधामुळे लोहासारख्या काही पोषक घटकांचे शोषण रोखू शकते. चहा किंवा कॉफीमध्ये दूध नसले तरीही , कॅफिन आणि टॅनिन असतात; जे पचन आणि पोषक शोषणावर परिणाम करू शकतात, (फोटो सौजन्य: @Freepik) -
एखाद्याच्या आवडीनुसार चहा-कॉफी पिण्याची इच्छा असेल तर ही पेये घेण्यापूर्वी जेवणानंतर किमान एक तास थांबा व मग त्याचे निवांत सेवन करा. (फोटो सौजन्य: @Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल