-
शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी निरोगी आहाराचे सेवन करने आवश्यक आहे. तुमचे शरीर हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी शरीरातील लोह वापरते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भाज्या, फळे यांचा आपण आहारात समावेश तर करतो. पण, फळांच्या बियांकडे मात्र दुर्लक्ष करतो. काही बिया अत्यंत पौष्टीक असून त्याचे आश्चर्यकारक फायदे आहेत. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुमच्या शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही पुढील काही काही बियांचा आहारात समावेश करून पाहू शकता… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तीळ, भोपळ्याच्या बिया, अंबाडीच्या बिया, भांग बिया आदींचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर या चार बियांचे आरोग्यदायी फायदे देखील जाणून घेऊ… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तीळ – तीळ हे फायबर आणि वनस्पती प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत ; जे तुमच्या शरीरातील लोहाची पातळी वाढवण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात. तसेच तीळ व्हिटॅमिन बी चे देखील चांगले स्त्रोत आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भोपळ्याच्या बिया – भोपळ्याचे बियाणे मॅग्नेशियम, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात ; जे हृदयाचे आरोग्य वाढवण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अंबाडीच्या बिया – अंबाडीच्या बिया सुपरफूड असून, या बियांचे तुम्ही सेवन करू शकता. अंबाडीच्या बिया लिग्नॅन्सचा समृद्ध स्रोत आहेत; ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो आणि आरोग्य सुधारू शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
भांग बिया ज्यांना Hemp Seeds असेही म्हंटले जाते. या बिया ओमेगा-फॅटी ॲसिड व ओमेगा-६ फॅटी ॲसिडनी समृद्ध असतात. याबरोबरच या बियांमध्ये प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिसिडंट असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल