-
उन्हाळ्यात सतत काहीतरी थंडगार पेय प्यावेसे वाटते. त्यात नारळपाणी पिणे म्हणजे अगदी सुख. (फोटो सौजन्य: @freepik)
-
नारळपाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे मानले जाते.तर आज आपण नारळपाणी पिण्याचे फायदे आणि मधुमेही रुग्ण नारळपाणी पिऊ शकतात का हे पाहणार आहोत. (फोटो सौजन्य: @freepik)
-
हैदराबादच्या क्लिनिकल डाएटिशियन, केअर हॉस्पिटल्सच्या डॉक्टर सुषमा यांच्या मते, उन्हाळ्याच्या महिन्यांत हायड्रेटेड राहण्यासाठी नारळाचे पाणी उत्तम पर्याय आहे असे सांगितले आहे. (फोटो सौजन्य: @freepik)
-
डॉक्टरांनी सांगितलेले नारळपाण्याचे आरोग्यदायी फायदे पाहू… (फोटो सौजन्य: @freepik)
-
नारळपाण्याच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. (फोटो सौजन्य: @freepik)
-
नारळपाण्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारून आणि रक्ताच्या गुठळ्या तयार करणे कमी होऊन हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत मिळते. (फोटो सौजन्य: @freepik)
-
नारळपाण्यातील पोटॅशियम सामग्री घामाने शरीरावाटे निघून गेलेल्या इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करण्यास मदत करते. (फोटो सौजन्य: @freepik)
-
मधुमेही नारळपाणी पिऊ शकतात का?
अनेक फळांच्या रसांच्या तुलनेत नारळपाण्यात साखरेचे प्रमाण तुलनेने कमी असते. तरीही त्यात नैसर्गिक शर्करा असते; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी प्रभावित होऊ शकते. मधुमेहींनी नारळाच्या पाण्याचे सेवन करताना मर्यादा ठेवली पाहिजे ; असे डॉक्टर सुषमा यांनी स्पष्ट केले. (फोटो सौजन्य: @freepik) -
गर्भवती महिलांसाठी नारळाचे पाणी फायदेशीर आहे का?
गर्भवती महिलांनी हायड्रेटेड राहणे हे आईचे आरोग्य आणि बाळाचा विकास यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असते. नारळपाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स निर्जलीकरण टाळण्यास, मळमळ, बद्धकोष्ठता यांसारख्या सामान्य लक्षणे दूर करण्यास मदत करू शकतात. (फोटो सौजन्य: @freepik)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल