-
न्यायाची देवता म्हटला जाणारा शनिदेव जर ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलत असेल तर त्याचा निश्चितपणे बारा राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. अशा परिस्थितीत, एका राशीत परत येण्यासाठी साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो. शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत आहे.
-
आता शनिदेव २९ जून २०२४ रोजी रात्री ११.४० वाजता पूर्वगामी म्हणजेच वक्री होणार आहे. वक्री म्हणजे उलट चाल होय. नोव्हेंबर पर्यंत शनिदेव याच स्थितीत राहणार आहेत. शनि ग्रह १३५ दिवस वक्री राहणार आहे.
-
शनिदेवाच्या वक्री स्थितीमुळे काही राशींना अपार पैसा, सुख समृध्दी लाभण्याची शक्यता आहे. शनिच्या चालीमुळे कोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊयात…
-
शनिदेवाची वक्री चाल मेष राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
-
शनिदेवाची वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रातही फायदा होऊ शकतो. यावेळी प्रमोशनसह पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते.
-
शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकतो. या काळात नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य -लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन