-
उन्हाळा आला की घशाला कोरड पडणे, घामाने हैराण होणं हे सर्व आलंच. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पण, याबरोबरचं अंगाला खास सुटणे, त्वचा लाल होणे, घामोळे, पुरळ येणे आदी त्वचेच्या समस्या जाणवू लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
या उन्हाळ्याच्या ऋतूत तुमच्या शरीराला थंड ठेवण्याचे असेल तर काही घरगुती उपाय करून पाहू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पुढील उपाय तुम्हाला उष्णेतेपासून त्वचा थंड ठेवण्यात आणि घामोळे, पुरळ, खाजेपासून तुमची सुटका करतील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एलोवेरा – कोरफड नैसर्गिकरित्या थंड आणि दाहक-विरोधी गुणधर्माने परिपूर्ण आहे ; जे त्वचेला थंड ठेवण्यास आणि खाजेपासून तुमची सुटका करण्यास मदत करतात. त्यात प्रतिजैविक गुणधर्म देखील आहेत ; याचा अर्थ ते बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चंदन पावडर – चंदनामध्ये अँटि मायक्रोबिअल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ; जे त्वचेचा लालसरपणा आणि खाज कमी करण्यास मदत करतात. पेस्ट बनवण्यासाठी चंदन पाण्यात मिसळा आणि घामोळे आलेल्या जागेवर लावा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काकडी – काकडीमध्ये भरपूर पाणी असते आणि त्यात त्वचा थंड करण्याचे गुणधर्म असतात ; जे लालसरपणा, खाज सुटणे आणि सूज टाळण्यास देखील मदत करतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बेकिंग सोडा – बेकिंग सोडा एक एक्सफोलिएटिंग एजंट आहे ; जो त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास आणि खाज न सुटण्यास मदत करू शकतो. हे तुमच्या आंघोळीत मिसळा जेणेकरून तुमची त्वचा थंड राहील. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
थंड शॉवर घ्या – घामोळे आलेलं असतात तेव्हा त्वचेला थंड करणे आवश्यक आहे. त्वचेला थंड ठेवण्यासाठी तुम्ही रात्री किंवा सकाळी थंड पाण्याचा शॉवर घेऊ शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)

लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल