-
उखाणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच आपण उखाणा म्हणतो लग्नसराई असो किंवा कोणतेही शुभ कार्य विवाहित स्त्री आवडीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा घेते. (Photo : Pexels)
-
हल्ली महिलांबरोबर पुरुष मंडळी सुद्धा पत्नीचे नाव घेत उखाणा घेतात. अनेकदा इच्छा असूनही पुरुष मंडळी उखाणा पाठांतर नसल्याने पत्नीसाठी उखाणा घेऊ शकत नाही. अशा पुरुषांसाठी आपण काही खास उखाणे जाणून घेणार आहोत. या उखाण्यांच्या मदतीने नवरेदव असो किंवा विवाहित पुरुष पत्नीसाठी उखाणा घेऊ शकणार. (Photo : Pexels)
-
१. समुद्रात छोटीशी होडी, ………… ची आणि माझी लाखात एक जोडी
२. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,… झाली आज माझी गृहमंत्री (Photo : Pexels) -
३. एक होती चिऊ, एक होता काऊ, …. चे नाव घेतो डोकं नका खाऊ
४. ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस, …. तू मला सुपरवूमन वाटतेस (Photo : Pexels) -
५. ती पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला ……… ने खाल्ला जास्तच भाव
६. मटणाचा कला रस्सा, चिकन केले फ्राय; ……… भाव देत नाही किती पण करा ट्राय (Photo : Pexels) -
७. कृष्णाला बसून राधा हसली, ……. माझ्या ह्रदयात बसली
८. खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, …….. माझी; सर्वात देखणी… (Photo : Pexels) -
९. रूप तिचे गोड, नजर तिची पारखी, शोधूनही सापडणार नाही… सारखी
१०. कृष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी, …..ला ठेविन, आयुष्यभर सुखी (Photo : Pexels) -
११. देव आमचा विठोबा, विठेवरी उभा, ….. ने वाढवली आमच्या घराची शोभा
१२. गाडीत गाडी डेक्कन क्वीन… आह माझी ब्युटी क्वीन (Photo : Pexels) -
१३. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार……… सारखा हिरा
१४. साखरेचे पोते सुईने उसवले, ….. ने मला पावडर लावून फसवले (Photo : Pexels)
महिलांनो आता मेथीची भाजी निवडायचं टेन्शन कायमचं गेलं; या भन्नाट ट्रीकनं ५ मिनिटांत मेथी साफ, VIDEO पाहून अवाक् व्हाल