-
उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाश, प्रदूषण आणि टाळूच्या घामामुळे केसांचे खूप नुकसान होते. यामुळे केस कोरडे होऊ लागतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केस गळण्याची आणि तुटण्याची समस्या जास्त प्रमाणात निर्माण होऊ लागते. तर या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक सौंदर्य उत्पादने वापरतात. पण, हे टाळून तुम्ही पुढील काही उपाय करून पाहू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
टोपी घाला – केसांना उन्हापासून वाचवण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे टोपी घालणे. दुपारच्या वेळेस घरातबाहेर पडत असाल तर टोपी घालायला विसरू नका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्वचेप्रमाणेच तुमच्या केसांचे संरक्षण करणाऱ्या उत्पादनांचा तुमच्या डॉक्टरांशी बोलून वापर करा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सकाळी दहा ते दुपारी चार दरम्यान खूप ऊन असते. महत्वाचे काम नसल्यास या वेळेत घराबाहेर पडू नका किंवा स्कार्फ केसांना बांधा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
केस स्वच्छ धुवा: स्विमिंग पूल किंवा समुद्रात पोहल्यानंतर शक्य तितक्या लवकर आपले केस स्वछ पाण्याने धुवून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हेअर स्ट्रेटनरचा उपयोग जास्त करू नका – हेअर स्ट्रेटनरमुळे तुमचे केस कमकुवत होऊ शकतात. तसेच तुम्ही हेअर स्ट्रेट केल्यानंतर उन्हात घराबाहेर गेलात तर केसांचे आणखीन नुकसान होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तुम्ही केसांवर खोबरेल तेल वापरू शकता. गरम तेलाने केसांना मसाज करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. रात्रभर असेच राहू द्या, नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हेअरस्टाईल करा – तुमचे केसांची वेणी बांधा किंवा केसांना क्लिप लावून त्यांना बांधा ; ज्यामुळे ते उन्हाळ्यात खराब होणार नाहीत. (फोटो सौजन्य: @Freepik)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स