-
चहा हा आपल्या दररोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी दिवसाची सुरुवात आपण चहाच्या सेवनाने करतो. काही लोक तर दिवसभरातून दोन तीन वेळा घेतात. (Photo : Freepik)
-
तुम्ही चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्ती फेकू देता का? जर हो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Photo : Freepik)
-
कारण आज आपण चहा बनवल्यानंतर गाळण्यातील चहापत्तीचा कसा उपयोग करायचा, याविषयी जाणून घेणार आहोत. (Photo : Freepik)
-
अनेकदा घरी चहा बनवल्यानंतर चहापत्ती तशीच शिल्लक असते. मग या चहापत्तीचा काहीही उपयोग होणार नाही, हा विचार करून आपण चहापत्ती फेकून देतो पण असे करू नका. (Photo : Freepik)
-
या चहापत्तीचा कसा उपयोग करायचा याविषयी सांगितले आहे. ही ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Photo : Freepik)
-
सुरूवातीला चहाचा गाळ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाणी टाकून द्यायचे.
त्यानंतर ही चहापत्ती काचेच्या भांड्यावर घासायची. (Photo : Freepik) -
या चहापत्तीने काचेच्या भांड्यावरील सर्व डाग निघून जातात. एवढचं काय तर आरसा पुसायला सुद्धा तुम्ही ही चहापत्ती वापरू शकतात. (Photo : Freepik)
-
याशिवाय जिथे लिंबाचे, किंवा इतर कोणतेही डाग पडले असेल त्याठिकाणी ही चहापत्ती घासा, डाग झटक्यात निघून जाईल. (Photo : Freepik)
-
ही ट्रिक पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. आजवर जो कोणी चहाचा गाळ फेकून द्यायचे, ते आता चहा गाळाचा योग्य उपयोग करतील. (Photo : Freepik)

Transshipment Facility : बांगलादेशची चीनशी जवळीक, भारतानं घेतला मोठा निर्णय; ‘ही’ सुविधा केली पूर्णपणे बंद!