-
ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा बुध ग्रह त्यांच्या हालचाली बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो.
-
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो.
-
ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह १४ जून २०२४ रोजी रात्री १०.५५ वाजता मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहेत, तर २७ जून रोजी मिथुन राशीमध्ये बुधदेवाचा उदय होणार आहे.
-
बुध ग्रहाच्या उदयाचा सर्व राशीच्या लोकांवर परिणाम होईल. पण यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी बुध ग्रहाचा उदय अक्षय फलदायी ठरेल.
-
बुधदेवाच्या कृपेने मिथुन राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकतो. आर्थिक फायदासोबतच या राशीतील लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकतो. या काळात रखडलेली कामं मार्गी लागू शकतात.
-
बुधदेवाच्या कृपेने सिंह राशीतील लोकांना या काळात विशेष लाभ मिळू शकतो. तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जे लोक सरकारी नोकरीच्या तयारीत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचारही करू शकता. व्यवसायात लाभ होऊ शकतो.
-
बुधदेवाच्या कृपेने कुंभ राशी राशीसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना लोकांना फायदा होऊ शकतो. या राशींच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
-
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
-
(फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीचे तीन ठार; एक बालक गंभीर जखमी