-
आपल्यातील अनेकांना त्वचेच्या समस्या आहेत. त्वचा टॅन होणे, वारंवार पिंपल्स येणे, डोळ्यांखाली काळे डाग येणे किंवा चेहऱ्यावर डाग दिसणे, त्वचा कोरडी होणे इत्यादी समस्या प्रत्येकाला असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर अशावेळी स्किनकेअर करताना कोणत्या चुकीच्या गोष्टी तर करत नाही आहे ना हे लक्षात घेणं महत्वाचे आहे. तर आज आपण स्किनकेअर करताना कोणत्या सवयी सोडल्या पाहिजेत, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊ… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
हार्श क्लिंझर वापरणे – हार्श क्लिंझर नैसर्गिक तेल कमी करते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
त्वचा हायड्रेट न ठेवणे – दररोज मॉइश्चरायझर वापरा. विशेषतः जर तुमची त्वचा कोरडी असेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
बाहेर जाताना सनस्क्रीन न लावणे – सनस्क्रीन लोशन दिवसातून एकदाच लावणे फायद्याचे ठरते. ते तुमची त्वचेची उन्हापासून काळजी घेते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
चेहऱ्यावरचा मेकअप न काढता झोपणे – जर तुम्ही मेकअप न काढता असंच झोपी जात असाल तर तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मेकअप ब्रश स्वछ न करता वापरणे – मेकअप केल्यानंतर ब्रशेस स्वच्छ न केल्यास त्यामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण वाढू शकते आणि तुमच्या त्वचेचे नुकसानही होऊ शकते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
पुरेशी झोप न घेणे – अपुऱ्या झोपेमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या, सूज आणि त्वचा निस्तेज होऊ शकते. त्यामुळे पुरेशी झोप घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मुरुमांना स्पर्श करणे – मुरुमांना सतत स्पर्श केल्याने डाग आणि जळजळ होण्याचा धोका वाढू शकतो. (फोटो सौजन्य: @Freepik)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”