-
पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी विवाहित महिला दरवर्षी वटपौर्णिमा साजरी करतात. हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे.
-
सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिला वटपौर्णिमेला व्रत करतात.
-
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. यंदा २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला उपवास करुन वडाच्या झाडाची पूजा करतात.
-
यादिवशी सुवासिनी एकमेकांना वाण देतात. वटपौर्णिमेच्या दिवशी वाण देण्याची देण्याची प्रथा फार जुनी आहे.
-
या वाणात पाच काळ्या मण्यांच्या माळीसह आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ ही फळं ठेवली जातात.
-
पण अनेकांना प्रश्न पडतो की, वटपौर्णिमेच्या वाणात हीच पाच फळं का ठेवली जातात? तर यामागेही एक कारण आहे.
-
ते म्हणजे ही पाचही फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. शिवाय ही हंगामी फळ आहेत. ज्यामुळे ती मोठ्याप्रमाणात वर्षभरातून एकदा खायला मिळतात.
-
त्यामुळे वाणाच्या निमित्ताने ही फळं खायला मिळतात. तसेच वाण देताना महिलांना समाधानही मिळते.
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?