-
भारतासह जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. दरम्यान, बहुतेक स्त्रिया आणि मुली त्यांच्या सौंदर्याबद्दल खूपच चिंतीत असतात. त्यांना नेहमीच त्यांच्या वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. (फोटो: Freepik)
-
जर आपणही आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याबद्दल खूप संवेदनशील असाल, तर काही योगासने करून आपण आपल्या चेहऱ्याची नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकाल.(फोटो: Freepik)
-
ही योगासने आपण दररोज करू शकता आणि सुरकुत्यांसारख्या सर्व त्रासांपासून दीर्घकाळ दूर राहू शकता. रोज योगा केल्यास निस्तेज त्वचेवर तेज येते.(फोटो: Freepik)
-
फेशियल योगा करून तुम्ही तुमच्या त्वचेची चमक परत मिळवू शकता, कारण जेव्हा तुम्ही योगा करता तेव्हा तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण वाढते आणि त्यानंतर ऑक्सिजन त्वचेच्या पेशींपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे ते अधिक फ्रेश होते. (फोटो: Freepik)
-
ज्याची त्वचा सैल आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात, त्यांनी योगा केलाच पाहिजे, त्यामुळे त्यांची त्वचा घट्ट होते. तुम्ही फेशियल योगादेखील करू शकता. आज आम्ही तुम्हाला फेस योगाबद्दल सविस्तर सांगणार आहोत.(फोटो: Freepik)
-
तोंडात हवा भरा आणि बोटांनी हळूवारपणे मालिश करत राहा. मसाज करताना दोन्ही गाल पूर्णपणे बंद ठेवा. आता तोंडातून हवा बाहेर सोडा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मसाज करा. (फोटो: Freepik)
-
जर आपल्याला ‘डबल चीन’ची समस्या असेल किंवा आपला चेहरा लोंबकळलेला दिसत असेल, तर आपली हनुवटी वर उचला आणि वर आकाशाच्या दिशेने पाहा. (फोटो: Freepik)
-
आता आपले तोंड सतत १० ते १५ सेकंद उघडे ठेवा आणि नंतर बंद करा, त्यानंतर चेहरा सामान्य स्थितीत आणा. दररोज चार ते पाच वेळा हे आसन नियमित करा.(फोटो: Freepik)
-
फेशियल योगा करण्याचे फायदे म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते. वृद्धत्वामुळे होणार्या येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यात मदत करू शकते.(फोटो: Freepik)
लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल