-
प्रत्येकाला वाटतं की, आपली त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार असावी. पण, यासाठी त्वचेची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आपला चेहरा हे आपल्या सौंदर्याचे प्रतिबिंब असते असे आपण अनेकदा ऐकतो. तर चेहरा उजळ आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही पुढील काही घरगुती उपाय करून पाहू शकता… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एलोवेरा जेल – एलोवेरा जेल सूजलेल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. कारण – यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत ; जे त्वचेला थंड ठेवण्यास मदत करतात, नैसर्गिक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध घालतात आणि चेहऱ्यावरील मुरुमांचे स्वरूप कमी करण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
नारळाचे तेल – नारळाचे तेल तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करते. त्यात अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी गुणधर्म असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मध – मधामध्ये अँटिऑक्सिडेंट असतात जे त्वचेवरील छिद्र स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.(फोटो सौजन्य: @Freepik)
-
हळद – हळद ही एक नैसर्गिक antiseptic आहे ; जी मुरुम आणि जखमांवर उपचार करण्यासाठी वापरली जाऊ शकते. हळदीमध्ये त्वचा उजळ करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे डाग दूर होतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
काकडी – काकडी त्वचेला चमकण्यास मदत करतात. त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जसे की व्हिटॅमिन के ; जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
लिंबू – लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे त्वचा उजळते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तज्ज्ञांचा सल्ला – तसेच तुमच्या चेहऱ्याला वरील गोष्टींचा त्रास होत असेल किंवा तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. (फोटो सौजन्य: @Freepik)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”